चापलवाडा घरफोडी

चापलवाडा चक येथे घरफोडी; १ लाख ९० हजारांची रोकड लंपास

Chapalwara burglary: चापलवाडा चक येथे घरफोडी झाली; अज्ञात चोरट्याने १ लाख ९० हजार रुपयांची रोकड चोरली. घटना १ मे २०२६ रोजी घडली, पोलिस तपास सुरू आहे.

चापलवाडा चक येथे घरफोडी; १ लाख ९० हजारांची रोकड लंपास

Chapalwara burglary

घोट (Chapalwara burglary) : घोटपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या चापलवाडा चक येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून १ लाख ९० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,धनराज गोसाई चलाख (वय ३८) हे ग्रामपंचायत चापलवाडा येथे संगणक ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. १ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास ते घराबाहेर असताना अज्ञात इसमाने त्यांच्या घराच्या स्वयंपाकघरावरील कवेलू काढून घरात प्रवेश केला. यानंतर (Chapalwara burglary) घरातील लोखंडी कपाटातील चोरकप्यात ठेवलेल्या एकूण २ लाख ७० हजार रुपयांपैकी १ लाख ९० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली.

ही (Chapalwara burglary) घटना ४ मे २०२६ रोजी सकाळी १०.४५ वाजता उघडकीस आली.या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध घोट पोलीस मदत केंद्रात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०५ (अ) व ३३१ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच घोट पोलिसांनी तत्काळ हालचाल करत गडचिरोली येथून श्वान पथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण केले. त्यांनी घटनास्थळी पाहणी करून पुरावे संकलित केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार समीर रॉय व सिडाम करीत आहेत.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज

मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.

Sep 24, 2026
केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

लोहगडच्या दरीत नेऊन केतनचा मृत्यू; आरोपींनी घटनास्थळासह लोणावळ्यातील दरीतील मृत्यूंची माहिती शोधल्याचा पोलिसांचा दावा

Sep 23, 2026