घरफोडी व चोरीचे गुन्हे

घरफोडी व चोरीचे चार गुन्हे उघड; १० लाख ७० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

Burglary-Theft Crimes: हिंगोली पोलिसांनी चार घरफोडी व चोरीचे गुन्हे उघड करून १०.७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक गुन्हे उघडण्याची शक्यता.

घरफोडी व चोरीचे चार गुन्हे उघड; १० लाख ७० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

Burglary-Theft Crimes

हिंगोली (Burglary-Theft Crimes) : जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्र फिरवून घरफोडी व चोरीचे चार गुन्हे उघड करून १० लाख ७० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. 

जिल्ह्यातील घरफोडी व चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.  निलाभ रोहण यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. १ एप्रिल रोजी गुन्हे शाखेचे पथक हिंगोली शहरात पेट्रोलिंग करीत असताना माला विरूध्दच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती देत होते. ज्यामध्ये शेख रेहान शेख शकील रा. आजम कॉलनी हिंगोली याच्यासह अन्य साथिदारांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे हद्दितील नर्सी फाट्यावरील शंभू ट्रेडींग कंपनी आडत दुकान, साई ट्रेडींग कंपनी आडत दुकान व लिंबाळा मक्ता येथील सुधन वेअर हाऊस येथील शेतीमाल तुर, सोयाबीन, हळद, हरभर्‍याचे कट्टे चोरले (Burglary-Theft Crimes) असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने  तपासचक्र फिरवून शेख रेहान शेख शकील याला ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केल्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे हद्दितील तीन गुन्हे केल्याची कबुली दिली.

चोरीतील मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकुण ५ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला. तसेच १ एप्रिलला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती आधारे सय्यद साजिद सय्यद मुजबी रा.मस्तानशहा नगर हिंगोली यास ताब्यात घेऊन त्याने इतर साथिदारासह नर्सी नामदेव पोलिस ठाणे हद्दितील तळणी शिवारातील शेत आखाड्यावरील तुरीचे व हळदीचे कट्टे चोरल्याची कबुली दिल्याने चोरीतील मुद्देमाल व (Burglary-Theft Crimes) गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकुण ५ लाख ३० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला अटक करून नर्सी नामदेव पोलिसांकडे सुर्पूद करण्यात आले. जिल्ह्यातील तीन चोरी व एक घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केला.

या (Burglary-Theft Crimes) चोरट्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप मोरे, पांडुरंग राठोड, संदिप जाधव, नितीन गोरे, निरंजन नलवार, धनंजय क्षिरसागर, ज्ञानेश्वर पायघन, शिवाजी इंगोले, मारोती काकडे, प्रदिप झुंगरे यांच्या पथकाने केली आहे.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026