कळमनुरी गोमांस जप्त

कळमनुरीत 54 किलो गोमांसासह दोघे ताब्यात, गुन्हा दाखल

Kalmanuri Beef Case: हिंगोलीच्या कळमनुरी येथे 54 किलो गोमांस जप्त करून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला.

कळमनुरीत 54 किलो गोमांसासह दोघे ताब्यात, गुन्हा दाखल

Kalmanuri Beef Case

कळमनुरी (Kalmanuri Beef Case) : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 54 किलो गोमांस जप्त करून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही घटना आज, 9 मे 2026 रोजी सकाळी घडली. 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 मे 2026 रोजी सकाळच्या सुमारास कळमनुरी येथील नाईकवाडी मोहल्ल्यात वाड्यातील एका ठिकाणी आरोपी गोमांसाची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस ठाणे  रवि नारायण इंगोले यांनी पथकासह छापा टाकला. या (Kalmanuri Beef Case) कारवाईत इलियास अहमद कासिम कुरेशी  आणि शेख निसार शेख इकबाल कुरेशी, दोघेही रा. नाईकवाडी मोहल्ला, कळमनुरी यांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडून 54 किलो गोमांस जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत 12,960 रुपये आहे. आरोपींनी संगनमत करून आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या (Kalmanuri Beef Case) प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात  महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रेम कुमार माकोडे करीत आहेत. दोन्ही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

Kalamnuri Municipal Council: डे-नाईट मेडिकलच्या बाजूला पाणीपुरवठ्याची पाईपलाईन संबंधित गुत्तेदाराच्या कामादरम्यान फुटल्याने पठाण गल्ली, माली गल्ली, ताजनगर यासह परिसरातील नागरिकांना मागील आठ दिवस..

Oct 06, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
दीड कोटींच्या सफाई टेंडरनंतरही कळमनुरी घाणीतच!

दीड कोटींच्या सफाई टेंडरनंतरही कळमनुरी घाणीतच!

Kalamnuri Municipal Safai Tender: शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेने दीड कोटींपेक्षा अधिक रकमेचे सफाई टेंडर काढले असतानाही शहरातील अस्वच्छता कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Oct 02, 2026
कळमनुरीत अवैध सावकारी प्रकरणी कारवाई; घरावरील छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

कळमनुरीत अवैध सावकारी प्रकरणी कारवाई; घरावरील छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

Kalamnuri illegal money-lending case: महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अन्वये अवैध सावकारी प्रकरणात कळमनुरी तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Sep 29, 2026