हिंगोली हत्या प्रकरण

अनैतिक संबंधासाठी जन्मदात्या आईनेच केली मुलाची हत्या; प्रियकरासोबत रचला कट

Hingoli murder case: हिंगोलीत एका धक्कादायक प्रकारात, जन्मदात्या मातेने प्रियकराच्या मदतीने आपल्या मुलाची हत्या केली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

अनैतिक संबंधासाठी जन्मदात्या आईनेच केली मुलाची हत्या; प्रियकरासोबत रचला कट

Hingoli murder case

आरोपीमध्ये जन्मदात्या मातेसह अन्य दोघांचा सहभाग

हिंगोली (Hingoli murder case) : सेनगाव तालुक्यातील उमरदरी पाटीजवळ नाल्यात सापडलेल्या तरुणाच्या रक्तबंबाळ मृतदेह प्रकरणाने संपूर्ण तालुका हादरला असताना, या हत्याकांडामागील धक्कादायक सत्य समोर आले आहे. पोटच्या लेकराचाच जीव घेण्यासाठी जन्मदात्या आईने प्रियकरासोबत कट रचून सुपारी दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

अनोळखी मृतदेहाची ओळख पटली. ज्यामध्ये सचिन रामकिशन राजगुरू (३०) रा. वडद, ता. लोणार, जि. बुलडाणा असे निष्पन्न झाले. सचिनच्या वडिलांचे सुमारे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. वडिलोपार्जित शेती ठेक्याने देऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. काही वर्षांपूर्वी सचिनचा घटस्फोट झाला होता. त्याला साडेतीन वर्षांची संचिता नावाची मुलगी असून, सचिन व त्याची विधवा आई लिलाबाई राजगुरू आणि मुलगी संचिता राजगुरू असे तिघे एकत्र राहत होते. (Hingoli murder case) कौटुंबिक कलहामुळे सचिन मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला होता.

राशन दुकानदार रामदास विश्राम तनपुरे याचे सचिनची आई लिलाबाई रामकिशन राजगुरू हिच्यासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधांना सचिन अडथळा ठरत असल्याने, त्याला कायमचे दूर करण्याचा कट रचण्यात आला. यासाठी नरेश साबन्या पवार (रा. वडद) याला २५ हजाराची सुपारी देण्यात आली होती. (Hingoli murder case) घटनेच्या दिवशी रामदास व नरेश यांनी सचिनला मोटारसायकलवरून सेनगाव हद्दीत आणले. त्याला मद्यधुंद करून उमरदरी पाटीजवळ दगडाने डोके ठेचून निर्घृणपणे हत्या केली. ओळख पटू नये म्हणून मृतदेह नाल्यात फेकून आरोपी फरार झाले. रक्ताच्या थारोळ्यात तडफडत सचिनचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक बाब उघड झाली आहे.

या (Hingoli murder case) घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. टॅटुच्या धागाने मयताची ओळख पोलीसाना पटवण्यात यश आले. स्थानिक गुन्हा शाखा व सेनगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या षड्यंत्राचा पर्दाफाश केला. पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, परीविक्षाधिन पोलिस उपाधिक्षक मयुर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

यात सपोनि शिवसांब घेवारे, पोउपनि दिलीप मोरे, सेनगाव ठाण्याचे सपोनि दिपक मस्के, नागनाथ पाटील, निरंजन नलावार, संदीप जाधव, जीवन मस्के, नितीन गोरे, पांडुरंग राठोड, विक्की कुदंनानी, रवी स्वामी, चापोह पाईकराव, धनंजय क्षिरसागर, चापोशि इंगोले, तुळशीराम वंजारे व सायबर सेलचे दत्ता नागरे, इरफान पठाण यांनी ही कामगिरी केली आहे. आदींचा सहभाग होता. (Hingoli murder case) अनैतिक संबंधासाठी जन्मदात्या आईनेच मुलाच्या हत्येची सुपारी दिल्याचा हा प्रकार समाजमन सुन्न करणारा ठरत असून, या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
पेट्रोल पंपाच्या वादातुन चोंडीत खंजीराने एकाची हत्या, पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल 

पेट्रोल पंपाच्या वादातुन चोंडीत खंजीराने एकाची हत्या, पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल 

Petrol pump murder case: वसमत तालुक्यातील चोंडी स्टेशन येथील साई उमेश पेट्रोलपंपावर पेट्रोलपंप चालविण्यावरून झालेल्या वादाचा रक्तरंजित शेवट झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली.

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026