परभणी दुकान फोडी

परभणीत बोरीच्या बसस्थानक परिसरात चार दुकाने फोडली...!

Parbhani Shop Burglary: चौरगतामुळे चालू असलेली दुकाने फोडून चाळीस हजाराची रोकड गायब झाली. पोलिसांनी घटना तपासण्यात सुरुवात केली.

परभणीत बोरीच्या बसस्थानक परिसरात चार दुकाने फोडली...!

Parbhani Shop Burglary

 

गल्ल्यातील रोख रक्कमेवर मारला डल्ला व्यापारी, नागरीकांत भितीचे वातावरण...!

परभणी (Parbhani Shop Burglary) : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील बसस्थानक परिसरात चोरट्यांनी तीन किराणा दुकान व कृषी केंद्र फोडून चाळीस हजाराची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवार १० जुलै रोजी मध्यरात्री नंतर घडली. बाजारपेठ परिसरात झालेल्या चोरीमुळे व्यापारी, नागरीकां मधून संताप व्यक्त होत आहे. 

बस स्थानक परिसरात चोरट्यांकडून पोलिसांना आव्हान देणारी चोरी करण्यात आली आहे. यामध्ये गोपाळ माने यांचे स्वराज कृषी केंद्र फोडत पाच हजार, महादेव सोनटक्के यांच्या किराणा दुकानातून पाच हजार, माणिक भाग्यवंत यांच्या दुकानातून पंधरा हजार, हर्षनंदन घोलप यांच्या किराणातून पंधरा हजार रोकड चोरीला गेली आहे. शनिवार ११ जुलै रोजी सकाळी वृत्तपत्र वितरक आणि काही नागरीकांच्या निदर्शनास ही घटना आली. सपोनि. रामेश्वर धोंडगे यांच्या सुचनेनुसार सपोउपनि. महादेव गायकवाड, पोलीस अंमलदार शेख वसीम, शेख मोबीन, राजेश जटाळ, श्रीराम दंडवते, कोकाटे, कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

सपोनि. राम मुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान, ठसे पथक दाखल झाले. श्वानाला मात्र चोरट्यांचा मागोवा लागला नाही. स्थानिक गुन्हे शाखेचे पांडुरंग तुपसुंदर, मुकेश बुधवंत, उमेश चव्हाण, राम पौळ आदींनी सीसीटिव्ही व इतर बाबींची तपासणी केली. सपोनि.रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या घटनेनंतर चोरट्यांचा लवकर शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.  तपासाकडे लक्ष लागलेआहे. पोलिसांची रात्रीची गस्त, गायब झालेली वीज व पोलिसांनी घटनास्थळी झालेला विलंब या कारणांमुळे चोरी झालेल्या दुकानांचे मालक व काही सुजाण नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. 

सीसीटिव्ही फुटेजचा आधार
 घटनास्थळा जवळील काही व्यापारी बांधवांनी सीसीटिव्ही फुटेज उपलब्ध करुन दिले आहे. यााचा आधार घेऊन घटनेचा जलद गतीने तपास चालू केल्याचे सपोनि. रामेश्वर धोंडगे, महादेव गायकवाड यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

Consumers Hit by Inflation: विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी डाळी, तेल, तूप आणि अन्य किराणा वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. बाजारात कडधान्यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खर्चात भर

Sep 30, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!

‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!

CJP Abhijit Dipke: कॉकरोच जनता पार्टीने निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजावर अनेक गंभीर आरोप केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Sep 24, 2026
टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

Tavetola Village Road: पिटेशूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सुमारे ४० लोकवस्तीच्या टवेटोला गावाला जोडणारा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.

Aug 31, 2026
वायगावात ५० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

वायगावात ५० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Vaigaon Person Suicide:  तालुक्यातील वायगाव येथे ५० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरातील खोलीच्या स्लॅबच्या कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

Aug 30, 2026