परभणी इसम मृतदेह

परभणीत राहटी पुलावरुन उडी घेतलेल्या इसमाचा मृतदेह मिळाला...!

Parbhani Dead body: वसमत महामार्गावर गोदावरीच्या असलेल्या राहटी पुलावरुन एका इसमाने नदीपात्रात उडी मारल्याची घटना रविवार २ ऑगस्ट रोजी घडली होती. सदर इसमाचा मृतदेह

परभणीत राहटी पुलावरुन उडी घेतलेल्या इसमाचा मृतदेह मिळाला...!

Parbhani Dead body

 

परभणी शहर महापालिका अग्निशमन दलाची शोध मोहिम

परभणी (Parbhani Dead body) : वसमत महामार्गावर गोदावरीच्या असलेल्या राहटी पुलावरुन एका इसमाने नदीपात्रात उडी मारल्याची घटना रविवार २ ऑगस्ट रोजी घडली होती. सदर इसमाचा मृतदेह शोधण्यात शहर महापालिका अग्निशमन दलाला यश आले आहे. ३ ऑगस्ट रोजी या इसमाचा मृतदेह नांदगाव खु. शिवारात नदीपात्रामध्ये मिळून आला.

या (Parbhani Dead body) घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बालप्रसाद शिवदास कवले, ता. वसमत जि. हिंगोली याने रविवार २ ऑगस्ट रोजी राहटी पुलावरुन नदीपात्रात उडी घेतली होती. सदर इसमाच्या शोधाबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडगे यांनी परभणी अग्निशमन दलाला माहिती दिली. रविवारी सायंकाळ पर्यंत शोध मोहिम राबविण्यात आली. मात्र मृतदेह आढळला नाही. त्यानंतर सोमवारी पुन्हा शोध मोहिम राबविण्यात आली. यावेळी सदर इसमाचा मृतदेह मिळून आला. अग्निशमन अधिकारी दिपक कानोडे, फायरमन गौरव देशमुख, रोहित गायकवाड, अक्षय पांढरे, सोनाजी खिल्लारे यांनी शोध मोहिमेत सहभाग घेतला.

संबंधित सामग्री

परभणीतील थुना नदीपात्रात ५५ वर्षीय व्यक्तीचा आढळला मृतदेह

परभणीतील थुना नदीपात्रात ५५ वर्षीय व्यक्तीचा आढळला मृतदेह

Parbhani Dead body: पूर्णा शहरालगतच्या थुना नदीच्या पात्रात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा पाण्याने फुगलेला मृतदेह १२ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या पुर्वी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

Aug 13, 2026
परभणीत रुढी शिवारातील विहिरीत अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह

परभणीत रुढी शिवारातील विहिरीत अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह

Parbhani Dead body: मानवत  तालुक्यातील रूढी शिवारातील एका विहिरीत अंदाजे ३४ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Aug 09, 2026