हिंगोली (Kurunda Gambling Den) : जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने कुरुंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत एका मोठ्या जुगार अड्ड्याचा (Kurunda Gambling Den) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ९ जुगारींना अटक करण्यात आली असून, एकूण २ लाख ७८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या पथकाने ३१ मार्च २०२६ रोजी ही कारवाई केली. कुरुंदा शिवारातील आबासाहेब देशमुख यांच्या शेतातील आखाड्यासमोर 'झन्ना मन्ना' नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याधारे पथकाने छापा टाकून ९ जणांना रंगेहाथ पकडले.
यामध्ये आबासाहेब केशवराव देशमुख, गंगाधर रखमाजी खंदारे, ज्ञानेश्वर मारोती खंडागळे, बंडू लक्ष्मण कांबळे, मारोती लक्ष्मण काळे, सय्यद मुस्तफा सु. मुनीर, राहुल नागोराव गायकवाड, खंडुजी तुकाराम गुहाडे आणि संतोष केरबा दळवी सर्व राहणार कुरुंदा यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून या छाप्यात पोलिसांनी ७ मोबाईल फोन, ४ मोटारसायकली, २३,७०० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २,५४,९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मटका जुगारावरही कारवाई करण्यात आली. याच मोहिमेदरम्यान गिरगाव येथील बसस्थानकावर तुकाराम उत्तमराव कर्हाळे (रा. गिरगाव) हा 'कल्याण बाजार' नावाचा मटका जुगार (Kurunda Gambling Den) खेळत असताना आढळला. त्याच्याकडून १,३०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या (Kurunda Gambling Den) दोन्ही प्रकरणांत कुरुंदा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, भुजंग कोकरे, शिवाजी जालमिरे, साईनाथ कंठे, हरीभाऊ गुंजकर, ज्ञानेश्वर गोरे, नरेंद्र साळवे आणि आकाश टापरे यांच्या पथकाने केली आहे. जिल्ह्यात यापुढेही अवैध धंद्यांविरुद्ध अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
कुरुंदा शिवारात जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांना अटक; २.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त
Kurunda Gambling Den: हिंगोलीमध्ये कुरुंदा शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांना अटक केली गेली, २.७८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.
Kurunda Gambling Den
संबंधित सामग्री
जळीत कांडावरून पुढार्यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर
Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल
Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय
Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा
Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल