वनविभाग कारवाई

उमरा फाट्यावर वनविभागाची धडक कारवाई: विनापरवाना सागवान लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त

Forest Department action: हिंगोलीतील कळमनुरी येथे विनापरवाना सागवान लाकडाची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोवर या कारवाईने अवैध लाकड तस्करीवर वचक बसवला.

उमरा फाट्यावर वनविभागाची धडक कारवाई: विनापरवाना सागवान लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त

Forest Department action

कळमनुरी (Forest Department action) : हिंगोली नांदेड या मुख्य रस्त्यावर कळमनुरी तालुक्यातील उमरा फाटा परिसरात विनापरवाना सागवान लाकडाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर वनविभागाने 19 एप्रिल रोजी धडक कारवाई करत वाहनासह लाकूड जप्त केले. या कारवाईमुळे अवैध लाकूड तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका टेम्पोमधून विनापरवाना सागवान गोल लाकडाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून वनपरिमंडळ अधिकारी शिवाजी काळे, वनरक्षक अशोक चव्हाण यांनी १९ एप्रिल रोजी उमरा फाटा येथे टेम्पो क्र. एमएच 29 टी 3171 ला थांबवून तपासणी केली.

तपासणीदरम्यान टेम्पोमध्ये सागवान गोल लाकूड आढळून आले. चालकाकडे या लाकडाच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना मागितला असता तो सादर करता आला नाही. त्यामुळे संबंधित टेम्पोसह सागवान लाकूड तात्काळ जप्त करण्यात आले. वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जप्त करण्यात आलेल्या सागवान लाकडाची किंमत सुमारे ५० हजार रुपये आहे.

ही (Forest Department action) कारवाई विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे व सहाय्यक वनसंरक्षक सचिन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी शिवाजी काळे, वनरक्षक अशोक चव्हाण यांनी केली. पुढील तपास वनविभागाकडून सुरू असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे परिसरात अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांवर वचक बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026