भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी!
रिसोड (Crop Damage) : रिसोड तालुक्यात गेली 3 ते 4 दिवसापासून मोठया प्रमाणात पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, तुर, हळद आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेक शेती साहित्य ड्रीप पाईप अक्षरशः वाहून गेले आहेत. अनेकांच्या राहत्या घरात सुद्धा पाणीच पाणी झाले आहे. भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या (Bhumiputra Farmers Association) वतीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करून त्यांना शासनाने हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करावी!
रिसोड तालुक्यातील मोप, वाकद, रिसोड आदी मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या (Farmers) बांधावर जाऊन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी पाहणी केली. तसेच शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करावी. अन्यथा भूमिपुत्र कडुन बाधित शेतकऱ्यासाठी आंदोलन केले जाणार असल्याचे भूमिपुत्र कडुन सांगण्यात आले.
भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित!
यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये डॉ. जितेंद्र गवळी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रवींद्र चोपडे, श्रीरंग नागरे, भूमिपुत्राचे शहराध्यक्ष विकास झुंगरे, युवक तालुका अध्यक्ष शंकर पाटील सदार, रवी पाटील जाधव तथा पाचंबा, गणेशपूर, शेलू खडसे, पिंपरखेड आदी गावचे शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. उदया 18 ऑगष्टला सकाळी मांगवाडी, भर जहाँ, मोरगव्हाण, बोरखेडी, एकलासपूर, मोठेगांव या ठिकाणच्या नुसकानग्रस्त भागाची पाहणी भूमिपुत्र कडुन केली जाणार असल्याचे रवींद्र चोपडे यांनी सांगितले.