एक ऑक्टोबरला मोर्चाचे आयोजन!
बार्शीटाकळी (Crop Damage) : पावसामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers) शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अतिवृष्टी मदतीपासून तालुका वंचित आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी (Heavy Rain) ग्रस्त घोषित करा. असे निवेदन बार्शीटाकळीचे तहसीलदार यांना शेतकरी संघर्ष समितीने (Farmers Struggle Committee) दिले आहे.
तहसीलदारांना निवेदन!
बार्शीटाकळी तहसीलदार यांना दिनांक 26 सप्टेंबरला बार्शीटाकळी तालुका संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनातून बार्शीटाकळी तालुक्यातील अनेक गावातील परसरात मे जून जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने, शेतकऱ्यांच्या शेतातील मुंग ,उडीद, सोयाबीन, कापूस, तूर अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने (Government) नुकत्याच जाहीर केलेल्या अतिवृष्टी मदत यादीत बार्शीटाकोटी तालुक्याचा समावेश केला नसल्याने, शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे . त्यामुळे बार्शीटाकळी तालुक्याचा तात्काळ अतिवृष्टी ग्रस्त तालुक्याच्या यादीत समावेश करावा, झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी, शेतकऱ्यांना पिक विमा कर्जमाफी व इतर शासकीय योजनेचा तात्काळ लाभ द्यावा, अन्यथा 1 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल. अशा प्रकारचा इशारा संघर्ष समितीचे रमेश बेटकर, गजाननम्हैसने, सतीश गावंडे, भूषण गायकवाड, गजानन घुमशे, प्रकाश देशमुख, गोपाल भटकर, महादेव गावंडे, किरण ठाकरे, गणेश ताठे, वसंता जाधव, हिरालाल कावरे, एकनाथ आंधळे भागवत राऊत,महेफूज खान, रितेश चव्हाण, प्रकाश नंदापुरे, भारत बोबडे, गजानन मानतकर,अन्सार खान, प्रदीप राठोड, योगेश लाहोडकार ,प्रदीप खांडे, अनिल राऊत, वसंता गोळे, प्रल्हाद गालट,संतोष रोहनकर, गोपाल कटाळे, जगदेव लोखंडे, विठ्ठल अदमने,वसंत चव्हाण, नवरतन कावरे, सय्यद फारुक सय्यद मुस्ताक, सोहेल खान सलीम खान, आसद खान, प्रल्हाद खुळे, राजेश देशमुख असे अनेक जण यावेळी उपस्थित होते.