मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे जिल्हाधिकार्यांना निर्देश!
परभणी (Crops Damage) : पाथरी विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त (Heavy Rain) शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत करण्याबाबत अहवाल सादर करा. असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) पाटील यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीकडे आ. राजेश विटेकर यांनी पत्र देत लक्ष वेधले होते.
आ. राजेश विटेकर यांची मागणी!
सोनपेठ, पाथरी, मानवत व परभणी तालुक्यासह जिल्ह्यात वेगवेगळ्या मंडळात जुलै महिन्यात दोन ते तीन वेळा अतिवृष्टी झाली. यामुळे सोयाबीन, कापूस, मुग व इतर पिकांचे नुकसान (Crops Damage) झाले. घरामध्ये पाणी शिरल्याने घरांचे देखील नुकसान झाले. पशुधन दगावले. या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला. शासनाने पंचनामे करण्याबाबत प्रशासनाला (Administration) आदेश दिले. सरसकट नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात 31 मंडळातील शेतीचे नुकसान झाले आहे. पेडगाव, जांब, जिंतूर, वाघीधानोरा, चिकलठाणा, मोरेगाव, देऊळगावगात, मानवत, पाथरी, हादगाव, कासापुरी, परभणी ग्रामीण, झरी, सिंगणापुर, पिंगळी, टाकळी कुंभकर्ण, बोरी, दुधगाव, केकरजवळा, कोल्हा, ताडबोरगाव, रामपुरी, बाभळगाव, सोनपेठ, पूर्णा, ताडकळस, चुडावा, कावलगाव या मंडळात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत झालेल्या शेतकर्यांना (Farmers) मार्च 2023 च्या शासन (Government) निर्णयानुसार पीक नुकसानी बद्दल 2 हेक्टरच्या मर्यादेत जिरायती पिकांना प्रति हेक्टर 8 हजार 500, बागायती पिकांना प्रति हेक्टर 17 हजार प्रमाणे आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आ. राजेश विटेकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना भेटून केली आहे.




