जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तत्काळ पंचनामे करण्याची मागणी!
रिसोड (Crops Damage) : तालुक्यात 22 जुलै रोजी मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप उत्तर भारतीय महाराष्ट्र प्रदेश सचिव लखनसिंह ठाकूर (Lakhansingh Thakur) यांनी 22 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना (District Collector) निवेदन देत तत्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
अतिवृष्टीने अडचणी वाढवल्या!
निवेदनानुसार, वाकद, महागाव, बाळखेड, एकलासपूर, पिंपरखेड, वाडी वाकद, मोठेगाव आणि सरपखेडा या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पाण्याखाली गेली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक भागांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. पीक नुकसानामुळे शेतकरी (Farmer) हवालदिल झाले आहेत. यापूर्वीही निसर्गाच्या लहरीपणामुळे पेरणीत अडथळे आले असताना, आता या अतिवृष्टीने (Heavy Rain) अडचणी वाढवल्या आहेत.




 
			 
		

