Gadchiroli :- गडचिरोली जिल्ह्यात १८ ते २२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दिवाळी सण सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. तसेच विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक ०८ ते दिनांक २२ ऑक्टोबरपर्यंत जमावबंदी आदेश लागु करण्यात आले आहेत.
सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक ०८ ते दिनांक २२ ऑक्टोबरपर्यंत जमावबंदी
या कालावधीत अनुचित गोष्टींना मनाई केलेली आहे. शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इत्तर क्षेपणास्त्रे (Missiles) किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन (Police station)अधिकारी यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही असे जिल्हा दंडाधिकारी पंडा यांनी आदेशात नमुद केले आहे.




