स्फोटामुळे घरातील टीव्ही, फॅन, फर्निचर जळून खाक!
मानोरा (Cylinder Explosion) : शहरातील संभाजीनगर मधील मुकुंद पवार यांच्या राहत्या घरात दि. १७ ऑक्टोबर रोजी ११.३० च्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तूचे अतोनात नुकसान झाले आहे. सविस्तर असे की, मानोरा मंगरूळपी रोडवर असलेल्या शहरातील संभाजीनगर येथील मुकुंद पवार यांच्या घरात शुक्रवारी सकाळच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन धुव्वा उडाला. स्फोटाचा आवाज एवढा भयानक होता की, सदरील घटना पाहण्यासाठी शहरातील लोकांनी एकच गर्दी केली होती. या गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे घरातील टीव्ही, फॅन, फर्निचर जळून खाक झाले. तसेच कपडे सहित जळाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. दिपावली सणाच्या पर्वावर स्फोटाची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नगर पंचायत मानोराचे अग्निशामक वाहन (Fire Fighting Vehicle) वेळेवर पोहोचल्याने लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश आले.