दुर्गम आदिवासी गावात वस्त्रदान, मिठाई, घरगुती साहित्य वितरण व मोफत आरोग्य तपासणीने संपन्न
पारशिवनी (Ek Dip Manuskicha) : आकाशझेप फाऊंडेशन, ग्रामौन्नती प्रतिष्ठा ण कन्हान, रिआन हॉस्पीटल रामटेक, तहसील कार्यालय.वन विभाग पेंच आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी व ग्रामसेवक संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांच्या सयुक्त विद्यमाने (Ek Dip Manuskicha) “एक दीप माणुसकीचा” उपक्रमातंर्गत पारशि वनी तालुक्यातील अतिदुर्गम आदीवासी भागातील घाटपेंढरी सालई टोला येथे नारगरिकांना वस्त्रदान, मिठाई, घरगुती साहित्य वितर ण व निशुल्क आरोग्य तपासणी आणि औषध वितरण करून गावक-यांची दिवाळी उत्सव थाटात साजरा करण्यात आला.
आज दुपारी १२ वाजता सामाजि क उपक्रमाचे हे चौदावे वर्षी पारशिवनी तालुक्यातील अतिदुर्गम आदीवासी भागात घाटपेंढरी सालई टोला गावात ” एक दिवा माणुसकिचा उपक्रम” (Ek Dip Manuskicha) कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत अधिकारी मा. प्रदीपजी बम्हनोटे सर, प्रमुख वक्ता मा. ज्ञानेश वाकुडकर सर यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुणे डॉ शकिल अहमद जहागिर,मंगेश खापेकर, डॉ इरफान अहमद, कृषी अधिकारी पदमाक र बाळापुरे, सरपंच रामकली मंगलसिंह उरमाले आदी च्या प्रमुख उपस्थितीत रिबीन कापुन आरोग्य शिबीरा ची सुरूवात करून निशुल्क आरोग्य तपासणी व औष ध वितरण करण्यात आले.
तदंतर मान्यवरांच्या हस्ते गावातील ५१ कुटुंबाला वस्त्रदान, मिठाई, घरगुती साहित्याचे वितरण करून सर्वाना भोजन वितरण करण्यात आले. (Ek Dip Manuskicha) कार्यक्रमाचे संचालन संशोधन कडबे सर यांनी तर आभार खुशाल कापसे सर यांनी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता गोपाल कडु, मोह न लोहकरे, मोतीराम रहाटे, कमलसिंह यादव, आरोग्य विभाग जितेंद्र अनकर, प स सेवानिवृत्त विजय नाईक, धनराज मडावी, ग्रा प कोलीतमारा ग्राम पंचायत अधि कारी सचिन देशमुख, श्री ठवरे, गव्हाणे, सहारे, प्रशात लक्षणे, अगंणवाडी सेविका सुलोचना धुर्वे, प्रेम भोंडेकर, दिपक शिवरकर . रविद्र तयार. रिआन हॉ स्पिटल रामटेकचे डॉ प्रदीप बोरकर, डॉ. दुलेश जगणे, सिस्टर प्रियंका, विपिन बन्सोड सह पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय, पंचायत समिती पारशिवनी च्या शासकिय अधिकारी व कर्मचारी आदीने सहकार्य केले.