गावातील नागरिकांच्या जिवाला धोका!
मानोरा (Dam Burst) : तालुक्यात शुक्रवारी रात्री दि. 8 ऑगस्ट रोजी पासून कोसळलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाल्याला आलेल्या पुरामुळे मौजे पिंपरी (हनुमान) शिवारात जिल्हा परिषद (Zilla Parishad) अंतर्गत बांधण्यात आलेल्या धरणाच्या भिंतीला दोन्ही बाजूने तडे गेल्याने 3 गावातील (Village) नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच शेकडो हेक्टर शेत जमीन वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत सबंधित उपाय योजना (Solution Plan) करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
तातडीने दखल घेऊन प्रशासनाने उपाय योजना करण्याची मागणी!
सविस्तर असे की, तालुक्यात शुक्रवार रात्रीपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत, धो-धो पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नदी, नाल्याला आलेल्या पुरामुळे मौजे पिंपरी (हनुमान) शिवारात जिल्हा परिषद अंतर्गत बांधण्यात आलेल्या धरण पूर्णतः भरले. धरण भरल्याने दोन्ही बाजुच्या भिंतीला तडे गेले असल्याने तलाव फुटण्याची परिस्थिती (Lake Bursting Conditions) निर्माण झाली आहे. सदरील धरण फुटले की, मौजे पिंपरी (हनुमान), कोलार , गिरोली आदी गावाला हानी होवू शकते. व धरणाखालील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतमधील पिके वाहून जाऊन शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भिती शेतकरी व गावकरी मंडळींनी व्यक्त केली आहे. याबाबत तातडीने दखल घेऊन प्रशासनाने (Administration) उपाय योजना करण्याची मागणी शेतकरी व नागरिकांमधून होत आहे.
पावसाने धरण भरल्याने धरणाच्या दोन्ही बाजूच्या भिंतीला तडे गेले!
संततधार पावसाने धरण भरल्याने धरणाच्या दोन्ही बाजूच्या भिंतीला तडे गेले आहे. धरण फुटले (Dam Burst) तर धरणाखालील शेकडो हेक्टर शेत जमीन व चार गावे वाहून जाण्याची शक्यता बळावली आहे. अशी माहिती जि. प. सदस्य अरविंद पाटील इंगोले यांनी विचारले असता दिली.