अड्याळ येथील वनक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या सुरक्षा भिंतीचे नुकसान
अड्याळ (Adyal Forest Office) : कारधा-पवनी मार्गावरील वनक्षेत्राधिकारी कार्यालयासमोरुन रेती भरलेला टिप्पर मागे घेत असतांना वनक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या सुरक्षा भिंतीवर आदळला. त्यात सुरक्षा भिंत पडल्याने नुकसान झाले. यात सुदैवाने जीवितहानी टळली. सदर घटना दि. २१ मे रोजी सकाळी ८ वाजतादरम्यान घडली. त्यावेळी कार्यालय परिसरात असलेल्या (Adyal Forest Office) वनविभागाच्या कर्मचार्यांनी आर्थिक चिरीमिरी करुन एकमेकांना मारहाण केल्याने जवळपास १ तास चांगलाच राडा पहावयास मिळाला.
अड्याळ येथे घरकामासाठी रेती घेऊन जाणारा टिप्पर क्र.एमएच ३६ ए ७१३८ हा वनक्षेत्राधिकारी कार्यालयाजवळून टिप्पर मागे घेतांनी (Adyal Forest Office) कार्यालयाच्या सुरक्षा भिंतीला धडक दिली. यात सुरक्षा भिंत पडून नुकसान झाले.
त्यावेळी कार्यालय परिसरात असलेल्या वनकर्मचार्यांनी टिप्पर चालक-मालक यांचेशी आर्थिक देवाण-घेवाण केली. कर्मचार्यांनी पैश्याची उधळपट्टी करुन दारु ढोसली. त्यात अन्य व्यक्तिसोबत मारपीट झाली. दोघांमध्ये तुफान हाणामारी झाल्याने जवळपास तासभर कार्यालयासमोर राडा पहावयास मिळाला. या घटनेत सुरक्षा भिंतीचे जवळपास १ लाख रुपयांचे नुकसान झाले. मात्र (Adyal Forest Office) वनविभागाकडून कुठल्याही प्रकारची तक्रार पोलिसात केली नाही. यावरुन रेती तस्कर व वनविभागाच्या अधिकारी कर्मचार्यांमध्ये देवाण-घेवाण झाली असावी, अशी चर्चा होत आहे.
पवनी तालुक्यात रेती विक्रीचे परवाने १९ दिवसांपासून बंद असून टिप्पर चालकाकडे रॉयल्टी असल्याचे बोलले जात आहे. जेव्हा की रॉयल्टी बंद असतांना त्यांचेकडे रॉयल्टी आली कुठून? यावरुन वरिष्ठ अधिकार्यांचा आशिर्वाद तर नसावा, अशी कुजबुज सुरु आहे. यावरुन रेती तस्कर व वनाधिकार्यांचे साटेलोटे तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.