हिंगोली (Dandegaon Gambling Raid) : कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथे झन्ना मन्ना जुगार सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखा व आखाडा बाळापूर पोलिसांच्या पथकाने (Dandegaon Gambling Raid) बुधवारी मारलेल्या छाप्यात दहा जुगार्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 78 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यांतील अवैध धंद्याचा शोध घेऊन कार्यवाही करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात एक पथक पोलीस स्टेशन बाळापुर हद्दीत पेट्रोलिंग करीत होते या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथे 16 एप्रिल रोजी चालणाऱ्या (Dandegaon Gambling Raid) जुगार अड्ड्यावर छापा टाकून 10 जुगारींना ताब्यात घेऊन रोख रक्कम व साहित्य असा एकूण 78,600/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे हरिभाऊ गुंजकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर छाप्यामध्ये जुगार खेळणारे कोंडूआप्पा मुंजाजी रनखांब, कोंडीबा पिराजी नांदुरे, गोरखनाथ लक्ष्मण वावळे, मारोती जगदेवराव काळे, क्रिश्ना शंकरराव फुलारी, अंबादास गोविंद बळवंते, महादू शामराव बळवंते, भाऊराव जोमाजी साखरे, शंकर गंगाधर चांदीवाले, नारायण नामदेवराव उन्हाळे सर्व राहणार दांडेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांना ताब्यात घेण्यात आले होते हे सर्व जुगारी दांडेगाव (Dandegaon Gambling Raid) येथे गावठाण जमिनीतील मोकळ्या जागेत झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असताना स्थानिक गुन्हे शाखा व पो. स्टे. बाळापुर येथील पथकाने केली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, आखाडा बाळापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, नितीन गोरे, आजम प्यारेवाले, हरिभाऊ गुंजकर, साईनाथ कंठे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, सुनील रिठे यांच्या पथकाने केली आहे.




