70 हजार दोनशे रुपयाचे साहित्य लंपास
बार्शीटाकळी (Barshitakli Panchayat Samiti) : बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला लागून असलेल्या पंचायत समितीच्या कक्षातून दिवसा दुपारच्या सुमारास चोरट्याने लॅपटॉप ,पेन ड्राईव्ह रोख रक्कम व डी एस सी असे 70 हजार दोनशे रुपयांचे साहित्य लंपास केले आहे. या चोरीच्या घटनेची पंचायत समितीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये नोंद झाली आहे. दिवसा घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली.
चोरीच्या घटनेची सीसीटीव्ही कॅमेरयात नोंद
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला लागूनच (Barshitakli Panchayat Samiti) बार्शीटाकळी पंचायत समितीचे कार्यालय आहे. या कार्यालयात तालुक्यातील पाटखेड येथील पवन मनोहर फाळके हे पंचायत समितीमध्ये डाटा फिटर ची नोकरी करतात. सोमवारला ते आपल्या कर्तव्यावर आले होते. दुपारच्या सुमारास पंचायत समितीच्या लेखा विभागातील नरेंद्र राऊत यांनी त्यांना काही कामकाजासाठी त्यांच्या कक्षात बोलविल्यानंतर ते त्यांच्या भेटीला गेले. त्यांची भेट घेऊन आपल्या कक्षात आले असता त्यांनी आपले ठेवलेली बॅग दिसली नाही.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या चोरी झालेल्या दुचाकीचा तपास लागेना
सदर बॅगेमध्ये डेल कंपनीचा लॅपटॉप किंमत पस्तीस हजार रुपये, बियाण्याकरिता आणलेले तीस हजार रुपये, पेन ड्राईव्ह बाराशे रुपये व डिएससी चार हजार रुपये असे70 हजार दोनशे रुपयांचे साहित्य चोरट्याने लंपास केल्याची दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांची घटना (Barshitakli Panchayat Samiti) पंचायत समितीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नोंद झाली. सदर घटनेत एक युवक पिवळे टी-शर्ट व निळ्या रंगाचा पेंड परिधान केलेला एक पवन फाळके कार्यरत असलेल्या कक्षात प्रवेश करताना व बाहेर येताना सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला आहे.
म्हणजे यावेळी (Barshitakli Panchayat Samiti) पंचायत समितीचे शिपाई सुद्धा या परिसरात अस्तित होते. या घटनेची बार्शीटाकळी पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी बार्शीटाकळी पंचायत समितीला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली. बार्शीटाकळी पोलीस स्टेशनला लागूनच असलेल्या पंचायत समितीच्या कार्यालयात दिवसा चोरीची घटना घडल्याने सर्वत्र उलट सुलट खमंग चर्चा होत आहे.
चोरी गेलेल्या दुचाकीचा पोलिसांना तपास लागेना
पंचायत समितीच्या माजी पदाधिकाऱ्यांची खंत
पंचायत समितीच्या माजी पदाधिकाऱ्यांची खंत
बार्शीटाकळी पंचायत समितीच्या (Barshitakli Panchayat Samiti) तत्कालीन उपसभापती तथा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा पदाधिकारी सौ संगीताताई जाधव, रा. रेडवा यांचे पती मनोज जाधव यांची दुचाकी क्रमांक एम एच डब्ल्यू 35 30 व एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाचीबार्शीटाकळी पंचायत समितीच्या आवारातूनच काही महिन्यापूर्वी दोन दुचाकी दिवसा चोरीला गेल्या होत्या.
याबाबत मनोज जाधव यांनी बार्शीटाकळी पोलिसात फिर्याद दाखल केली. फिर्याद दाखल करून अनेक महिन्याचा कालावधी संपला असून या कालावधीत दोन-तीन ठाणेदार या पोलीस स्टेशनला कार्यरत होते. परंतु बार्शीटाकळी पोलिसांनी दिवसा चोरी झालेल्या दुचाकीचा अद्याप पर्यंत तपास केला नाही. अशा प्रकारचे मतउपसभापतीचे पती मनोज जाधव यांनी व्यक्त केले.