मराठा आरक्षणासाठी २५ गावाची निर्णायक बैठक; समाज बांधवांनी उपस्थित रहावे
परभणी (Maratha Reservation) : इंद्रायणी माळावरून रविवार २४ ऑगस्ट रोजी मुंबईला चलोचा निर्धार होणार आहे. यावेळी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) २५ गावाची निर्णायक बैठक होणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने या बैठकीला उपस्थित रहावे ही विनंती करण्यात आली आहे.
शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईकडे प्रस्थान होणार आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मुंबई येथील आझाद मैदानावर ते आरक्षणाच्या मागणीसाठी जाणार आहेत. त्याची तयारी म्हणून गावोगाव चावडी बैठका होत आहेत. अशा स्वरूपाची चावडी बैठक इंद्रायणीच्या माळावर रविवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केली आहे.
या बैठकीला परिसरातील २५ गावचे मराठा बांधव जमणार आहेत. या बैठकीला उद्धव भिसे संबोधित करणार आहेत. एकत्रितरित्या मराठा बांधव २९ ऑगस्ट रोजी मुंबईकडे जाण्याचा निर्धार इंद्रायणी माळावरून इंद्रायणी देवीच्या साक्षीने करणार आहेत. तरी पंचक्रोशीतील मराठा बांधवांनी या निर्धार बैठकीला उपस्थित रहावे अशी विनंती सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.