पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले आदेश
हिंगोली (Hingoli district) : जिल्ह्यात अवैध दारु विक्री केल्या प्रकरणी गुन्हे दाखल होत असताना वारंवार (illegal liquor) अवैध दारु विक्री केल्याने सहा जणांवर जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हद्दपारीची कारवाई केली आहे.
हिंगोली (Hingoli district) ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील बिलाल कासिम प्यारेवारे रा. गारमाळ, दिनेश उर्फ बालाजी वामन पवार रा. कलगाव, वैजनाथ नामदेव मुकाडे रा. संतुक पिंपरी, जगन माधव काशिदे रा. उमरखोजा तसेच कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलिस हद्दीतील देविदास लालजी आडे रा. भाटेगाव, तुकाराम राघोजी डुकरे रा. सुकळीवीर यांच्या विरुध्द अवैध दारु विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
त्यावरुन (Hingoli district) हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस.पी. डोंगरे व आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राम गोणारकर यांनी कलम ५५ महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाची जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकटे यांनी सविस्तर तपासणी केली. ज्यामध्ये बिलाल प्यारेवाले, दिनेश उर्फ बालाजी पवार, वैजनाथ मुकाडे, जगन काशिदे या चार जणांना सहा महिन्याकरीता तर देविदास आडे, तुकाराम डुकरे या दोघांना तीन महिन्याकरीता हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले.
दारु विक्रीतून परावृत्त झालेल्या देविदास आडे यांचाही हद्दपारीच्या कारवाईत समावेश
कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील देविदास लालजी आडे हे (illegal liquor) दारु काढणे व त्याची विक्री करणे याच व्यवसायातून ते उपजिवीका भागवत होते. अवैध दारु विक्रीमुळे त्यांच्यावर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल होते. त्यामुळे तत्कालीन जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्याविरुध्द एमपीडीए कारवाईचा प्रस्ता व जानेवारी २०२२ मध्ये पाठविला होता. त्यामुळे एक वर्षासाठी त्यांच्यावर स्थानबध्दतेचे आदेश काढण्यात आले होते.
देविदास आडे यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्यांनी अवैध दारु विक्री न करण्याचा निर्धार करून शेती व्यवसायात अंग झोकले होते. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी व सध्याचे छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर व तत्कालीन जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी देविदास आडे यांचा २१ मार्च २०२३ रोजी सत्कार केला होता. विशेष म्हणजे देविदास लालजी आडे यांनी (illegal liquor) अवैध दारु विक्रीतून परावृत्त होवून शेती व्यवसाय सुरु केला असताना अवघ्या दोन वर्षात त्यांच्यावर (Hingoli district) अवैध दारु विक्रीचे गुन्हे दाखल झाल्याने आता त्यांना तीन महिन्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.