Corona Virus

देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही

देशात पुन्हा एकदा कोरोनाबाबत चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे.

देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही

Corona Virus

कडप्प्यातील मासापेटा येथील रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू; संपर्क शोध, निर्जंतुकीकरणासह प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू

अमरावती/कडप्पा : देशात पुन्हा एकदा कोरोनाबाबत चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील मासापेटा येथे राहणाऱ्या 46 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संबंधित रुग्णाला सुरुवातीला अँटीबायोटिक्स देऊन उपचार करण्यात आले, मात्र चार दिवस उलटल्यानंतरही प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत त्याला कोविड-19 संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

कडप्पाचे जिल्हा वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी रवी बाबू यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मृत व्यक्तीला मद्यपानाचे व्यसन होते. श्वास घेण्यास त्रास आणि सतत खोकला या तक्रारींमुळे त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयात करण्यात आलेल्या छातीच्या एक्स-रेमध्ये दोन्ही फुफ्फुसे गंभीररीत्या बाधित झाल्याचे आढळले. त्याला न्यूमोनियाही झाला होता. सुरुवातीला डॉक्टरांनी अँटीबायोटिक्सच्या माध्यमातून उपचार सुरू केले. मात्र चार दिवस उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांना कोविड संसर्गाचा संशय आला.

यानंतर रुग्णाच्या छातीचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यामध्ये कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. उपचार सुरू असतानाच संबंधित रुग्णाचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर आरोग्य विभागाने तातडीने खबरदारीची पावले उचलली आहेत. अधिकाऱ्यांनी रुग्णाच्या परिसरात निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्याबरोबरच त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध (Contact Tracing) सुरू केला आहे, जेणेकरून संसर्गाचा प्रसार रोखता येईल.

कोरोनाने सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी भारतासह संपूर्ण जगात मोठे संकट निर्माण केले होते. त्या साथीमध्ये कोट्यवधी नागरिक बाधित झाले, तर लाखो जणांचा मृत्यू झाला होता. दीर्घ काळानंतर आता पुन्हा देशात कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

दरम्यान, कडप्पा आणि तिरुपती जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर मेडिकल एज्युकेशन डायरेक्टर यांनी सर्व सरकारी रुग्णालयांकडून आयसोलेशन बेड, आयसीयू बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधांचा साठा, रॅपिड टेस्ट किट, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय मनुष्यबळ यांचा संपूर्ण तपशील मागवला आहे.

संबंधित सामग्री

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
शेतकऱ्यांच्या मुलांसाठी लातूरमध्ये अल्प दरात वसतिगृह

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी लातूरमध्ये अल्प दरात वसतिगृह

Latur Bazar Samiti: मागच्या तीन वर्षांत बाजार आवारात विविध विकास कामे राबविण्यात आली. लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अल्पदरात वसतिगृह सुरू करण्यात आले.

Sep 29, 2026
दुष्काळ जाहीर झाला, आता मदत कधी? अमोल मिटकरींच्या सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या

दुष्काळ जाहीर झाला, आता मदत कधी? अमोल मिटकरींच्या सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या

महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत, चारा-पाणी, पीककर्ज आणि इतर उपायांची मागणी केली.

Sep 26, 2026