भारतीय विमानतळ योजना

आकाशाला गवसणी; 30 हजार कोटींचा मेगा प्लॅन!

India Airport Development: 100 नवीन विमानतळ उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी जवळपास 30 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक

आकाशाला गवसणी; 30 हजार कोटींचा मेगा प्लॅन!

India Airport Development

नवी दिल्ली (India Airport Development) : देशातील हवाई वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने मोठी योजना आखली आहे. पुढील दहा वर्षांत देशभरात तब्बल 100 नवीन विमानतळ उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी जवळपास 30 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी या योजनेची माहिती दिली. देशातील विमानसेवा (India Airport Development) केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित न राहता छोट्या शहरांमध्ये आणि दुर्गम भागांमध्येही पोहोचावी, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे.

छोट्या शहरांना विमानसेवेची जोडणी

सरकारच्या UDAN (उडे देश का आम नागरिक) योजनेच्या माध्यमातून प्रादेशिक हवाई संपर्क वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. (India Airport Development) नवीन विमानतळांमुळे अनेक लहान आणि मध्यम शहरांना देशाच्या प्रमुख शहरांशी हवाई मार्गाने जोडण्यास मदत होईल. देशात विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेऊन विमानतळांची संख्या वाढवण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

पर्यटन आणि उद्योगालाही मिळणार चालना

नवीन विमानतळांमुळे (India Airport Development) केवळ प्रवाशांची सुविधा वाढणार नाही, तर संबंधित भागातील पर्यटन, उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळण्याची शक्यता आहे. दुर्गम आणि तुलनेने कमी विकसित भागांमध्ये हवाई संपर्क वाढल्याने त्या भागांच्या आर्थिक विकासालाही वेग मिळू शकतो. पुढील दशकात 100 नवीन विमानतळ विकसित करण्याची ही योजना पूर्ण झाल्यास देशातील हवाई वाहतुकीचे जाळे आणखी व्यापक होणार असून, भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी हा मोठा टप्पा ठरण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

Nobel Prize 2026: हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांना रसायनशास्त्रातील नोबेल; ‘मिरर इमेज’चे गूढ उकलले

Nobel Prize 2026: हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांना रसायनशास्त्रातील नोबेल; ‘मिरर इमेज’चे गूढ उकलले

2026 चा रसायनशास्त्रातील नोबेल हेन्री कागन आणि केन्सो सोई यांना जाहीर; होमोचिरॅलिटीच्या गूढावर केलेल्या संशोधनाचा औषधनिर्मितीला मोठा फायदा.

Oct 07, 2026
राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
चारधाम यात्रेने रचला नवा विक्रम; भाविकांची संख्या तब्बल 56.18 लाखांपार

चारधाम यात्रेने रचला नवा विक्रम; भाविकांची संख्या तब्बल 56.18 लाखांपार

Chardham Yatra Record: यंदा केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटन

Oct 07, 2026
स्मृती मंधाना बनली टीम इंडियाची नवी कर्णधार

स्मृती मंधाना बनली टीम इंडियाची नवी कर्णधार

India captain Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट संघाला नवी कर्णधार मिळाली असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्मृती मंधानाची सर्व प्रकारच्या क्रिकेटसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.

Oct 07, 2026
सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026