झारखंडमधील कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल; हिंदू संघटनांकडून निषेध, कारवाईची मागणी
भगवान श्रीकृष्ण यांच्याबाबत एका इस्लामी विद्वानाने केलेल्या वक्तव्यामुळे देशभरात नवा वाद निर्माण झाला आहे. झारखंडमध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात मौलाना जर्जिस अन्सारी यांनी भगवान श्रीकृष्ण हे मुस्लीम होते आणि ते दिवसातून पाच वेळा नमाज अदा करत होते, असा दावा केला. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध हिंदू संघटना, संत आणि राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मौलाना जर्जिस अन्सारी यांनी भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील दहाव्या श्लोकाचा संदर्भ दिला आहे. त्या श्लोकाचा स्वतःच्या पद्धतीने अर्थ लावत त्यांनी, त्यामध्ये वर्णन केलेली ध्यानसाधना ही प्रत्यक्षात नमाज पठणाशी संबंधित असल्याचा दावा केला.
‘कृष्ण जी पांचों वक्त नमाज पढ़ा करते थे...’
— Famous9Media (@famous9media) July 16, 2026
इटावा के मौलाना जरजिश अंसारी ने ये जहरीला बयान दिया है।
साधु-संतों ने मौलाना को तुरंत, बिना किसी देरी के पाकिस्तान भेजे जाने की मांग की है।
पूरी खबर पढ़ें👇https://t.co/BDL2esOay4#srikrishna #viralvideo pic.twitter.com/BsW4vTIOqB
याच वक्तव्यात त्यांनी भगवान श्रीराम यांच्याबाबतही अशाच प्रकारचा दावा केला. भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीराम यांनी इस्लामच्या शिकवणीचा प्रसार केला होता, असेही त्यांनी म्हटल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या विधानानंतर अनेक हिंदू धार्मिक संघटना आणि संतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सनातन धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत संबंधित वक्तव्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच काही भाजप नेत्यांनीही या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत धार्मिक भावना दुखावल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
माहितीनुसार, हा व्हिडिओ २३ जून २०२६ रोजी झारखंडमध्ये झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमातील असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ असला तरी सध्या तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्याचे रहिवासी असलेले मौलाना जर्जिस अन्सारी यांचे यापूर्वीही काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे नाव चर्चेत आले आहे. दरम्यान, देशात कृष्ण जन्मभूमीशी संबंधित न्यायालयीन आणि सामाजिक स्तरावरील चर्चा सुरू असतानाच हा व्हिडिओ समोर आल्याने या वादाला आणखी वेग आला आहे.