हिंगोली (Dhangar reservation) : खा. नागेश पाटील आष्टीकर (MP Nagesh Patil Ashtikar) यांनी धनगर आरक्षणाबाबत (Dhangar reservation) शासनाला दिलेल्या पत्रावरून समाज माध्यमांवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे २४ सप्टेंबर रोजीचे एक पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. या पत्रात खा. आष्टीकरांनी मुख्यमंत्र्यांना धनगर समाजाच्या सुरू असलेल्या लातुर, पंढरपूर व नेवासा येथील आमरण उपोषणाला आपला पाठींबा असल्याचे नमूद आहे.
अनुसूचित जमातीच्या यादीत ‘धनगड’ असा उल्लेख असलेली जमात म्हणजेच धनगर असून (Dhangar reservation) धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात यावा अशा आशयाचे हे पत्र आहे. हे पत्र समाज माध्यमावर व्हायरल होताच खा. नागेश पाटील आष्टीकर (MP Nagesh Patil Ashtikar) यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्या तारखेला हे पत्र दिल्याचे दिसत आहे त्या तारखेला आपण आदिवासी समाजाचे नेते माजी आ. संतोष टारफे यांच्या सोबत सबंध दिवस आदिवासी प्रकल्प कार्यालयात होतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
मतदार संघातील कार्यकर्त्यांची कामे व्हावीत म्हणून अनेकांना कोरे पत्र दिलेले असतात. त्यापैकीच एखाद्या पत्राचा वापर करून ते व्हायरल करण्यात आले असावे, आपण असे पत्र दिलेलेच नाही असे खा. नागेश पाटील आष्टीकर (MP Nagesh Patil Ashtikar) यांचे म्हणणे आहे. हे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर आदिवासी समाजातील काही कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शविली होती.