जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघाची जबाबदारी!
बुलढाणा (Dhripadrao Sawale) : सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ साठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरुन बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, मेहकर, खामगाव व जळगाव जामोद या सातही विधानसभा मतदार संघाच्या प्रचार प्रमुख पदी धृपदराव सावळे (Dhripadrao Sawale) यांची नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रशासन तथा संघटन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी सदरचे नियुक्ती पत्र जारी केले असून, धृपदराव सावळे (Dhripadrao Sawale) यांनी बुलढाणा जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी यांच्यासोबत संपर्क साधून सातही उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील, या दृष्टीने नियोजन करण्याचे या नियुक्तीपत्रात नमूद केले आहे.