मुंबई (Congress Party) : बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ भाजप नेते धृपदराव सावळे (Dhripadrao Sawle) तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश नेते विठ्ठलराव लोखंडकार (Vitthalrao Lokhandkar) यांनी आज सोमवार 14 ऑक्टोंबर रोजी रात्री 9 वाजता टिळक भवन येथील (Congress Party) काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात, काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस नेते व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
धृपदराव सावळे (Dhripadrao Sawle) यांचा यानिमित्ताने पुन्हा स्वगृही प्रवेश झाला आहे, तर विठ्ठलराव लोखंडकार (Vitthalrao Lokhandkar) हे सुरुवातीपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सक्रिय होते. त्यांनीही (Congress Party) काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करून सर्वांना धक्का दिला आहे.