Digras :- तालुक्यातील चिंचोली क्रमांक १ येथील एका १५ वर्षीय बालकाचा खंडापुर शेतशिवारातील तलावात पाय घसरून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना २० ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान घडली.
शेतशिवारातील तलावात पाय घसरून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू
पवन हिम्मत ढोरे (१५) रा. चिंचोली क्र.१ असे बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. सदर मृतक बालकाची आई गुराखीचे काम करते. मृतक बालक हा आपल्या आई सोबत तालुक्यातील खंडापुर शेतशिवारात गेला होता. त्या शिवारातील तलावाच्या काठ किनाराजवळून चालत असतांना अचानक पाय घसरला. तेव्हा तो तलावाच्या पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह (Dead body)दिग्रस ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. शवविच्छेदन (Autopsy) करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतकाच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे