बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात प्रहारचे दिव्यांग बांधवांसह
अमरावती (Disability Certificates) : आयएएस पूजा खेडकर यांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळविली असून त्यांचे बिंग फुटल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.असे अनेक अधिकारी कर्मचारी बनावट (Disability Certificates) दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत कार्यरत असून त्या सर्वांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची फेरतपासणी करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे. सोमवारी दिव्यांग बांधवांसह बंटी रामटेके यांनी (Government service) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले.
पूजा खेडकर प्रकरणामुळे (Disability Certificates) दिव्यांग प्रमाणपत्राचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत आजही अनेक अधिकारी आणि कर्मचारी कायम आहेत त्यामुळे खऱ्या आणि गरजू दिव्यांग बांधवांला नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे.पैश्याच्या जोरावर प्रमाणपत्र बनवून अनेक कर्मचारी आणि अधिकारी गलेलठ्ठ वेतन घेऊन खऱ्या दिव्यांग बांधवांच्या मानगुटीवर बसले आहेत.ईतर दिव्यांग बांधवांना २०१८ च्या शासकीय आदेशानुसार पुन्हा नवीन प्रमाणपत्र बनवावे लागते मात्र वर्षानुवर्षे बनावट प्रमाणपत्र बनवून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा नियम लागू नाही.
त्यामुळे शासनाने (Disability Certificates) दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रमाणपत्राची फेरतपासणी करावी आणि यामध्ये बनावट प्रमाणपत्र आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी बंटी रामटेके यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी प्रहारचे जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू,महानगर प्रमुख बंटी रामटेके, शेख अकबर, गोलू पाटील,श्याम इंगळे, अभिजित गोंडाने, सुधीर मानके,मनीष पवार, अनुज बोंडे, शेषराव धुळे,अजय तायडे, विक्रम जाधव,पंकज सुरळकर,अमन गौरवे, अब्दुल शेख,फुलचंद पाटील,नरेंद्र चेंडकापुरे,पियुष ठाकूर,पंकज सोनटके,अमोल खाडे, पवन भटकर यांचेसह शेकडो दिव्यांग बांधव उपस्थित होते.