पाळणाघर सुरू करण्यासाठी शासनाची परवानगी घेणे बंधनकारक
गडचिरोली (District Nursery) : सद्यास्थितीत पाळणाघरांचे पिक फोफावले असल्याने बालकांचे आरोग्य तसेच शैक्षणिक कार्यावर विपरीत परीणाम होत असल्याने आता पाळणाघर सुरू करण्यासाठी शासनाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. (District Nursery) पाळणाघरात बालकांना मुलभूत सुविधा मिळतात काय याकडे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती वॉच ठेवणार आहे.
केंद्र शासनाने वैयक्तिक ,सेवा संस्था , महामंडळ , कंपन्या, विद्यापीठे , रुग्णालये , केअर सर्व्हिस प्रोव्हायडर,शासकीय संस्था, अशासकीय संस्था इ. यांचेकडून पाळणाघर कार्यान्वित करण्यासंदर्भात राष्ट्रीय किमान मानके व नियमावली लागू केली आहे. सदर मार्गदर्शक सूचनांसंदर्भात केंद्र शासनाशी विचारविनिमय करून (District Nursery) पाळणाघरासंदर्भात करावयाच्या कार्यवाही संदर्भातील प्रस्ताव एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, नवी मुंबई यांनी शासनास सादर केला होता. त्यानुषंगाने पाळणाघर संदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
राज्यात वैयक्तिक , सेवा संस्था, महामंडळ , कंपन्या ,विद्यापीठे , रुग्णालये, केअर सर्व्हिस प्रोव्हायडर, शासकीय संस्था, अशासकीय संस्था यांना पाळणाघर सुरू करावयाचे झाल्यास केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच संबंधित अटी शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहील.
पाळणाघर सुरू करणार्या संस्थेने मार्गदर्शक सूचनांप्रमाणे (District Nursery) पाळणाघरामध्ये सोयी सुविधा, पाळणाघर प्रशासन समिती, पाळणाघरामध्ये नियुक्त करावयाचे कर्मचारी व त्यांच्या नियुक्तीबाबतच्या अटी ,शर्ती व त्यांना द्यावयाचे प्रशिक्षण, पाळणाघर पर्यवेक्षिका व पाळणाघर मदतनीस यांची कर्तव्ये, पाळणाघरातील वैद्यकीय सुविधा, पाळणाघरासंदर्भात ठेवावयाच्या विविध नोंदी, सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजना इत्यादी निकषांचे पालन करणे , सोयी सुविधा उपलब्ध करणे बंधनकारक राहील.
पाळणाघरात पुरेशी जागा, मुलांसाठी अनुकूल सुविधा आणि स्वच्छतेच्या मानकांचे पालन असावे. आवश्यक वस्तूंमध्ये सुरक्षित पिण्याचे पाणी, पौष्टिक अन्न, खेळण्याचे साहित्य आणि आपत्कालीन संपर्क माहिती यांचा समावेश आहे. ६ महिन्यांपासूनच्या मुलांसाठी पाळणाघराची सुविधा उपलब्ध करून दिली जाऊ शकते. गरजेनुसार, कार्यालयीन जागा, निवासी अपार्टमेंट, शाळा, रुग्णालये इत्यादी विविध ठिकाणी (District Nursery) पाळणाघरे उभारता येतात.
खोलीत पुरेशी जागा उपलब्ध असावी, ज्यामध्ये पुरेसा वायुवीजन आणि प्रकाश व्यवस्था असावी, तसेच विश्रांती आणि अभ्यासासाठी जागा असावी. खिडक्या सुरक्षित उंचीवर आणि योग्यरित्या कुंपण घातलेल्या असाव्यात. सुरक्षित आणि शक्यतो शुद्ध पिण्याचे पाणी पुरवले पाहिजे.सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी नियमित सुरक्षा तपासणी केल्या पाहिजेत असेही आदेश शासनाने दिले आहेत.
अशी आहे जिल्हास्तरीय समितीची रचना
जिहास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहतील.सदस्य म्हणुन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी , बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) तर सदस्य सचिव म्हणुन जेष्ठ बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी)यांचा समावेश आहे. ही समिती जिल्ह्यातील पाळणाघरांवर संनियंत्रण ठेवणे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे (District Nursery) पाळणाघर चालविण्यात येत असल्याबाबतची खातरजमा करणे. आवश्यकता त्या सुधारणा होण्याबाबत निर्देश देणे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करणे आदी कार्य करणार आहे.