हवामान खात्याचा अंदाज: जिल्हा प्रशासनाकडून सूचना
गडचिरोली (District Yellow alert) : भारतीय हवामान खात्याने जिल्हयात दिनांक २६ ते २९ एप्रिल या कालावधीत येलो अलर्ट जारी केला आहे. २६ ते २९ या कालावधीत जिल्ह्यातील काही ठिकाणी ४०-६० किमी प्रति तास वारा वाहुन विजेच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे. (District Yellow alert) वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच सहणे आवश्यक आहे. अशा कालावधीमध्ये मोबाइल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावीत.
पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये. शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा . प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि हवामान खात्याच्या आवाहनाकडे लक्ष द्यावे. घराबाहेर असल्यास मजबूत छताखाली आसरा घ्यावा, (District Yellow alert गारपीट होत असताना मोकळया जागेतून वाहन चालवण्याचे टाळावे. विजेच्या तारा किंवा त्यांच्या जवळ जाण्याचे टाळावे.
आपत्तीची माहिती तात्काळ जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षास द्यावी. आवश्यक खबरदारी घेऊन स्वताची त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबीयांची व मित्र परिवाराची काळजी घ्यावी व प्रशासनाकडून निर्गमित होत असलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. परिपक्व झालेली पिके आणि भाजीपाला लवकरात लवकर काढा आणि कापणी केलेले उत्पादन सुरक्षित ठिकाणी ठेवा किवा शेतात कापणी केलेल्या उत्पादनांचे ढिग ताडपत्रीने झाकून टाकावे असेही आवाहन करण्यात आले आहे.