भाजपाचे डॉक्टर यावलकर यांनी बेसहारा गरिबांना दिला मदतीचा हात!
मानोरा (Diwali Celebration) : शहरातील मानोरा-मंगरूळपीर रोडवरील सन्मती आयुर्वेदिक हॉस्पिटलवर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ अरविंद यावलकर (District General Secretary Dr. Arvind Yawalkar) यांनी दि. २० ऑक्टोबर रोजी भटकंती करीत असलेल्या बेसहारा गरिब नागरिकांना दिवाळी साजरी करण्यासाठी फराळाचे पाकीट व रक्कम भेट म्हणून दिली.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही भाजपाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य डॉ अरविंद यावलकर यांनी शहरात भटकंती करून हलाखीचे जीवन जगणाऱ्या बे – सहारा महिला व पुरुषांना दिवाळी साजरी करण्यासाठी फराळ व काही आर्थिक रक्कम देवून मदतीचा हात दिला. यावेळी भाजपाचे शिवाजीनगर मानोराचे बूथ प्रमुख डॉ विशाल यावलकर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.