विद्युत करंट लागल्याने बेशुद्ध पडले!
आर्णी (Electric Shock) : नाल्यामध्ये मासोळी पकडत असताना एका 50 वर्षीय इसमाचा विद्युतच्या स्पर्शाने मृत्यू झाला. ही घटना काल दीं. 17 जुलै गुरुवार दुपारी 4 वाजता कोळवन शेत शिवारात घडली. मधुकर गोवींदराव बोरचाटे वय 50 वर्ष हे कोळवण शेत शीवार मध्ये असलेल्या एका शेतातील नाल्याचे पाण्यात विद्युत खांब (Electric Poles) वरून विद्युत वायर टाकून मच्छि पकडत असताना, विद्युत करंट (Electric Current) लागल्याने बेशुद्ध पडले त्यास उपचार करीता ग्रा. रु. आर्णी येथे आणले असता डॉ. यानी मरण पावल्या चे सांगीतले, या वरून पोलीस स्टेशन आर्णी येथे मर्ग नोंद झाला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.




