चीनवरील अवलंबित्व कमी करण्याची तयारी!
वॉशिंग्टन (Donald Trump Tariff Plan) : अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी हे प्रकरण स्मार्टफोन, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील नवीन शुल्काशी संबंधित आहे. अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी संकेत दिले आहेत की, लवकरच या उत्पादनांवर एक विशेष प्रकारचा कर (Tariff Plan) लादला जाणार आहे. त्यांनी असेही म्हटले की, हे (Tariff Plan) पाऊल केवळ आयात थांबवण्यासाठी नाही तर तांत्रिक स्वावलंबनाच्या दिशेने एक मोठा निर्णय आहे.
ट्रम्प प्रशासनाने (Donald Trump) अलीकडेच या उत्पादनांना मोठ्या शुल्कातून तात्पुरती सूट दिली आहे. ज्यामुळे अॅपलसारख्या मोठ्या टेक कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. पण आता सरकार या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना “सेमीकंडक्टर टॅरिफ” अंतर्गत आणणार आहे. हे (Tariff Plan) धोरण अमेरिकेत उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि चीनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
‘ही सवलत कायमची नाही’
लुटनिक यांनी स्पष्ट केले की, ही सवलत काही काळासाठीच आहे. भविष्यात, ही सर्व उत्पादने “सेमीकंडक्टर टॅरिफ” अंतर्गत समाविष्ट केली जातील. ते (Donald Trump) म्हणाले की, आम्हाला सेमीकंडक्टर, चिप्स, फ्लॅट पॅनेल आणि इतर आवश्यक तांत्रिक उपकरणे अमेरिकेतच बनवायची आहेत. या (Tariff Plan) गोष्टींसाठी आम्ही चीन किंवा आग्नेय आशियावर अवलंबून राहू शकत नाही.
औषधांवरही कर आकारला जाणार
येत्या एक-दोन महिन्यांत औषधांवर (Pharmaceuticals) देखील शुल्क लादले जाईल, असेही लुटनिक म्हणाले. प्रशासनाला असे (Tariff Plan) टॅरिफ मॉडेल लागू करायचे आहे. जे अमेरिकेत सेमीकंडक्टर आणि औषध उद्योग पुन्हा स्थापित करण्यास मदत करेल.
‘हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न’
वाणिज्य सचिवांनी असेही म्हटले की, हा केवळ व्यापाराचा प्रश्न नाही तर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. या सवलती कायमस्वरूपी नाहीत आणि कोणत्याही कराराद्वारे त्या काढून टाकल्या जाऊ शकत नाहीत. ही (Tariff Plan) अशी उत्पादने आहेत जी युनायटेड स्टेट्समध्ये बनवली पाहिजेत.
चीनवर 145% इतका मोठा कर
2 एप्रिल रोजी, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी व्यापारातील असमतोलाचे कारण देत अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात कर लादण्याची घोषणा केली. तथापि, 9 एप्रिल रोजी, चीन वगळता बहुतेक देशांसाठी हे शुल्क 90 दिवसांसाठी स्थगित केले. ट्रम्प प्रशासनाने चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर 145% इतका मोठा कर लादला आहे, तर उर्वरित देशांसाठी 10% बेसलाइन कर लादण्यात आला आहे.
जागतिक बाजारपेठांमध्ये अस्थिरता
या (Tariff Plan) टॅरिफ धोरणामुळे जागतिक शेअर बाजार चार दिवस घसरले आणि व्यापारात गोंधळ निर्माण झाला. यामुळे जगभरात मंदीची भीती व्यक्त केली जात आहे.