संभाजीनगर चा संघ ठरला द्वितीय पारितोषिकाचा मानकरी
काळानुरूप बदलणे आवश्यक: आ. सुलभाताई खोडके
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति रौप्य महोत्सवी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा
अमरावती (Dr. Punjabrao Deshmukh) : कुटुंब व्यवस्था बदलली असल्याने मानव समाज विखुरलेला आहे. संयुक्त कुटुंब व्यवस्था लोप होत असतानाच एकत्रित कुटुंब व्यवस्थेला डावलून विभक्त कुटुंब व्यवस्था समाजात रुजू होत आहे.त्यामुळे सामाजिक जीवन जगताना काळानुसार बदलण्याची गरज आहे असे मत आ .सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केले.
डॉ.पंजाबराव देशमुख (Dr. Punjabrao Deshmukh) विधी महाविद्यालय येथे आयोजित रौप्य महोत्सवी वाद विवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. उद्घाटन सत्राला अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड .जे .व्ही.पाटील उपाख्य भैय्यासाहेब पुसदेकर होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख,प्रा. डॉ .रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती.
आजच्या आधुनिक युगामध्ये वृद्धाश्रम व्यवस्था हि कुटुंब व्यवस्थेला पर्याय असू शकते,या विषयावर झालेल्या वाद-विवाद स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त करून स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सुलभाताई खोडके यांच्यासह ॲड. जे. व्हि. पाटील पुसदेकर यांनी देखील आपले विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ वर्षा देशमुख, संचालन प्रा.डॉ.राधिका देशमुख तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.गजश्री बोडखे यांनी केले. स्पर्धेत मध्ये (Dr. Punjabrao Deshmukh) डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचा संघ प्रथम पुरस्काराचा मानकरी ठरला.
यश टेबले व समृद्धी घोडचरे यांच्या संघाला रोख रक्कम अकरा हजार रुपये आणि डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Punjabrao Deshmukh) स्मृती चषक देऊन गौरविण्यात आले. सदर पुरस्कार हा स्व.सुधाकरराव काळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रा.डॉ.रवींद्र काळे यांच्या वतीने देण्यात आला. द्वितीय पुरस्काराचा मानकरी संभाजीनगर येथील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाचा संघ ठरला. त्यांना स्व.प्रभाकरराव पांडे स्मृती प्रित्यर्थ ॲड. अचला काशीकर यांच्या वतीने रोख रक्कम 7000 आणि चषक देऊन गौरविण्यात आले.
या संघामध्ये सौरभ लोंढे व वैभव बंगाळे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तर तृतीय पुरस्काराचा मानकरी श्री. शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथील कु.कादंबरी सरदार व प्रीती पांडे यांचा संघ ठरला त्यांना स्व.राजेंद्रसिंह बयस स्मृति प्रित्यर्थ प्रा. डॉ. योगीराज सिंग बयस यांच्याकडून रोख रुपये 5000 आणि स्मृति चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक कृष्णा नलावडे याला स्व .विनायकराव ठाकरे स्मृति प्रित्यर्थ प्रा.डॉ.उद्धव ठाकरे यांच्या वतीने रोख रक्कम 3000 आणि स्मृतीदिन देऊन गौरविण्यात आले.
वैयक्तिक द्वितीय पुरस्कार स्व. निर्मलाताई भोगे स्मृतिप्रित्यर्थ प्रा.डॉ.संजय भोगे यांच्याकडून रोख रक्कम 2000 आणि स्मृतिचिन्ह देऊन सौरभ गुडदे याला सन्मानित करण्यात आले. तर उत्तेजनार्थ तृतीय पारितोषिक स्व. देविदासजी पांडे स्मृती प्रित्यर्थ प्रसाद पांडे यांच्याकडून रोख रक्कम 1000 आणि स्मृतिचिन्ह देऊन गणेश राऊत या विद्यार्थ्याला गौरविण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ .सुरज हेरे, रश्मी नावंदर, व भगत सर यांनी केले. संपूर्ण स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून गोपाल उताणे यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण समारंभाला प्राचार्य डॉ.स्मिता देशमुख, ॲड .राजीव इंगोले यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले.
यासोबतच महाविद्यालयाच्या (Dr. Punjabrao Deshmukh) विविध स्पर्धांमध्ये तसेच गुणवत्ता यादीत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता शितल सनकाडे या विद्यार्थिनीच्या नेतृत्वात आयोजन समितीने परिश्रम घेतले. बक्षीस वितरण समारंभाचे संचालन शिवहार इंगळे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.