खरबी वळण बंधारा रद्द करण्यासाठी आक्रमक
हिंगोली (Dr. Ramesh Shinde) : खरबी वळण बंधारा, करून भूमिगत मार्गाने नदीचे ईसापुर धरणात पाणी सोडण्याकरिता 950 कोटीची निविदा निघालेले आहे. शासनानी नियम धाब्यावर बसून निविदा काढली आहे, हे खरबी वळण बंधारा रद्द करावे म्हणून,23 सप्टेंबर रोजी शेतकरी सेवक डॉ. रमेश शिंदे (Dr. Ramesh Shinde) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत आमरण उपोषणाला बसल्याने त्यांचा 6 व्या दिवशी सकाळी 7 वाजता, अचानक तब्येत बिघडल्याची माहिती पसरल्यानंतर, उपोषण स्थळी, सर्वपक्षीय, बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये, सर्वपक्षीय नेतेमंडळीच्या वतीने बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे. या संदर्भात पुन्हा 29 सप्टेंबर रोजी उपोषण स्थळी बैठक सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेल्या कयाधू नदीवरील खरबी येथील वळण बंधारा रद्द करण्यासाठी डॉ. रमेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ज्वलंत प्रश्न हाताळला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागेच सहा दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. 28 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांची तब्येत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी बैठक घेतली.
या बैठकीत संघर्ष समिती स्थापन करणे. आंदोलनाची दिशा ठरवणे, बंधारा रद्द करण्याबाबत न्यायालयात जाणे,संघर्ष समिती स्थापन करण्यासाठी मुख्य
21 लोकांची संघर्ष समिती बनवून, त्यांच्याखाली, प्रत्येक गावातील एक सदस्य याप्रमाणे, नदीकडच्या दीडशे गावातील प्रत्येक गावातून एक सदस्य घेणे,खरबी रद्द करण्याचा लढा,वरील सर्व संघर्ष समितीच्या माध्यमातून, लढण्यात येणार असून, सर्व लढ्यासाठी, उपोषणार्थी डॉ. रमेश शिंदे (Dr. Ramesh Shinde) यांची तब्येत आता साथ देणार नाही, या साठी पुन्हा 29 सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय नेते मंडळी, सर्व शेतकरी संघटना, दूध उत्पादक, फळबाग उत्पादक, शेतकरी शेतमजूर, नदीकडच्या दीडशे गावातील, प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे सर्व पक्षाच्या मंडळींनी ठरवण्यात आले.
खालील सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी माजी खा. शिवाजी माने, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, सापळी धरण संघर्ष सदस्य नंदकिशोर तोष्णीवाल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा पवार गट जिल्हाध्यक्ष बि.डी. बांगर , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश आप्पा सराफ , उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश देशमुख, वाशिम देशमुख शेतकरी सेना जिल्हाप्रमुख, माधवराव कोरडे, मनीष आखरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, माजी सभापती भानुदास जाधव,कांबळे, एकनाथ शिंदे जवळेकर, दत्तराव जाधव कडतीकर, राजेंद्र पाटील, संतोष टेकाळे, पुंजाजी मुळे, दाजीबा पाटील, श्रीराम शिंदे, गणेश शिंदे, किसनराव टेकाळे, गजानन रवी डोरले, सतीश शिंदे ,राजू पाटील, मदन लोथे ,भगवान जाधव ,भैया देशमुख, बबन गलंडे, दत्तराव पवार, सोमनाथ कोटकर, एकनाथ वाबळे ,कैलास वाबळे, गंगाराम गायवाळ, गंगाधर सरकटे,गजानन कावरखे ,नामदेव पतंगे, यांच्यासह अनेक गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.