हिंगोली (Dr. Ramesh Shinde) : जिल्ह्यातील शेती अतिवृष्टीने पूर्णपणे उद्धवस्त झालेली आहे. शेतकऱ्यांची पूर्ण शेती खरडून जाऊनही राज्य शासन तुटपुंजी मदत देण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत देण्यात यावी तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा, कयाधू नदीवर असलेल्या खरबी बंधारा रद्द करण्यात यावा यासह इतर मागण्यासाठी शेतकरी नेते डॉ. रमेश शिंदे (Dr. Ramesh Shinde) हे आज 15 ऑक्टोंबर रोजी केसापूर येथील स्मशानभूमीत थेट चितेवर बसून आंदोलन करणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यासह राज्यात ओला दुष्काळ जाहीर न केल्याने व शेतकऱ्यांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी संतप्त झालेल्या डॉ. शिंदे (Dr. Ramesh Shinde) यांनी हिंगोली तालुक्यातील केसापूर येथील त्यांच्या मूळ गावी स्मशानभूमीत 15 ऑक्टोंबर रोजी चितेवर बसून आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. हिंगोली जिल्ह्यात या वर्षी अतिवृष्टीमुळे हजारो एकर पिके वाहून गेली, शेतजमिनी खरडून गेल्या आणि शेतकरी उघड्यावर आले आहेत.
अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे.शासन मात्र गेंड्याची डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे. शासनाला शेतकऱ्याच्या वेदना जाणून घेण्यास रस उरला नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. ओला दुष्काळ जाहीर करा, कयाधू नदीवरील खरबी बंधाऱ्यामुळे परिसरातील पिकांचे प्रचंड नुकसान होणार आहे.
तो बंधारा रद्द करण्याची आणि ओला दुष्काळ जाहीर करावा. सेनगाव तालुक्यात ८७९ मिमी आणि हिंगोली तालुक्यात ८७१ मिमी पाऊस होऊनही या दोन्ही तालुक्यांना वाढीव मदतीतून वगळण्यात आले आणि नंतर समाविष्ट करण्यात आले. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे डॉ. शिंदे यांनी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. डॉ. शिंदे (Dr. Ramesh Shinde) यांनी आता शासनाने ओला दुष्काळ जाहीर केला नाही, खरबी बंधारा रद्द केला नाही तर हिंगोली-सेनगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांना वाढीव मदत दिली नाही यासह इतर मागण्यासाठी केसापूर येथील स्मशानभूमीत आज १५ ऑक्टोबर रोजी चितेवर बसून आंदोलन करणार आहेत.