हिंगोली (Dr. Ramesh Shinde) : जिल्हातील शेती अतिवृष्टीने खरडून जाऊनही ओला दुष्काळ व कर्जमाफीची घोषणा करण्यात शासन निर्णय करत आहे. शेतकऱ्याच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न राज्य शासन करून तुटपुंजी मदत देण्याचा प्रयन करीत आहे. शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत देण्यात यावी तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा.
कयाधु नदीवरील खरबी येथील बंधारा रद्द करण्यात यावा यासह इतर मागण्यासाठी हिंगोली तालुक्यातील केसापूर येथे शेतकरी नेते डॉ. रमेश शिंदे यांनी आज १५ ऑक्टोबर रोजी स्मशानभूमीत लाकडाचे सरण रचून त्यावर झोपून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा ठाम निर्धार (Dr. Ramesh Shinde) डॉ. शिंदे यांनी केला आहे.
हिंगोली जिल्ह्वासह राज्यात ओला दुष्काळ जाहीर न केल्याने व ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, ओला दुष्काळ जाहीर करून कयाधू नदीवरील खरबी बंधारा रद्द करावा. हिंगेली-सेनगाव तालुक्यांतील रेल्लचांना वाढीव मदत दिली नाही यासह इतर मागण्यासाठी हिंगोली तालुक्यातील केसापूर येथील स्मशानभूमीत आज १५ ऑक्टोबर पासून शेतकरी नेते डॉ. रमेश शिंदे (Dr. Ramesh Shinde) यांनी स्वतःचे सरण लाकडाचे रचून त्या चितेवर झोपून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
यावेळी त्यांच्या सरनाभोवती नागरिकांची गर्दी ही जमली होती. जोपर्यंत विविध मागण्या मान्य होणार नाही त्यावर आमरण उपोषण आंदोलन सुरूच राहणार असल्याचे डॉ. रमेश शिंदे (Dr. Ramesh Shinde) यांनी सांगितले. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मात्र या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.