Karanja :- कुत्रा रस्त्यात आल्याने बोलेरो पिकअपचा अपघात होऊन चालक जखमी झाल्याची घटना १७ जुलै रोजी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) घडली. प्राप्त माहितीनुसार, एमएच ३२ क्यू ११९० क्रमांकाचे बोलेरो पिकअप वाहन वर्धा येथून संभाजीनगर जात असताना अचानक वाहनासमोर कुत्रा आडवा आल्याने गाडी पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाला. संजय पुरजेकर (२७, रा. वर्धा ) असे जखमीचे नाव आहे.
अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग १०८ लोकेशन रवी शिंदे , पायलट डॉक्टर गणेश यांनी घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचार करून जखमीला पुढील उपचारासाठी वर्धा येथे रेफर करण्यात आले आहे.




 
			 
		

