देवरी तालुक्यातील पुराडा येथील घटना!
गोंदिया (Drowning Death) : गोंदिया तालुक्यातील पुराडा येथे एका शेतशिवारात तीन युवकांचे मृतदेह एकाच ठिकाणी आदळून आले. या घटनेने परिसरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना काल (ता.५) सायंकाळी दरम्यानची आहे. या घटनेची माहिती सालेकसा पोलिसांना (Salekasa Police) मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह तलावाबाहेर काढून तपासकार्याला सुरूवात केली आहे. आदित्य सुनील बैस (१५), तुषार मनोज राऊत (१७) दोन्ही राहणार गडेवारटोला/पुराडा तसेच अभिषेक रामचरण आचले (२१) रा.पुराडा ता.देवरी असे मृतांची नावे आहेत.
घटनेची माहिती सालेकसा पोलीस स्टेशन येथे देण्यात आली!
देवरी तालुक्यातील पुराडा गावशिवारात पुराडा येथे ५ ऑक्टोबर रोजी आदित्य सुनील बैस (१५), तुषार मनोज राऊत (१७) दोन्ही राहणार गडेवारटोला/पुराडा तसेच अभिषेक रामचरण आचले (२१) रा.पुराडा हे तिन्ही युवक गावातील शेत शिवारात असलेल्या गदाई बोडी परिसरात फिरायला गेले होते. दरम्यान आंघोळी नादात ते बोडीत उतरले. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचाही पाण्यात बुडून करुण अंत झाला. ही घटना रात्री ८ वाजतासुमारास उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती सालेकसा पोलीस स्टेशन येथे देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही युवकांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. तसेच उत्तरीय तपासणीकरीता ग्रामीण रुग्णालय देवरी येथे पाठविण्यात आले आहे. पुढील तपास सालेकसा पोलीस करीत आहे.
आदित्य सुनील बैस हा नूतन विद्यालय पुराडा येथील दहाव्या वर्गामध्ये शिकत होता तर तुषार मनोज राऊत हा विद्यार्थी शासकीय आश्रमशाळा पुराडा येथे १२ व्या वर्गामध्ये शिक्षण घेत होता. तर अभिषेक घरच्या कामाला हातभार लावण्याचा काम करीत होता. तिघांच्या मृत्यूने पुराडासह देवरी तालुक्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अन् सायंकाळ होताच आनंदावर विरजन!
गावात सांक्षगंध सोहळा आयोजित होता. या कार्यक्रमात गावकरी सहभागी झाले होते. सायंकाळच्या सुमारास आदित्य सुनील बैस (१५), तुषार मनोज राऊत (१७) दोन्ही राहणार गडेवारटोला/पुराडा तसेच अभिषेक रामचरण आचले (२१) रा.पुराडा हे तिन्ही युवक दुचाकीने फेरफटका मारत असल्याने गावकर्यांना दिसले. परंतु, सायंकाळ होवूनही युवक घरी न परतल्याने कुटूंबियांकडून त्यांचा शोध घेणे सुरू झाला. दरम्यान पुराडा शेतशिवारात असलेल्या गदाई बोडी नजीक यांची दुचाकी आढळली. बोडीजवळ जाऊन पाहणी केली असता, पाण्याच्या किनार्यावर छत्री व मृतकांचे चप्पल आढळून आले. याची माहिती गावात होताच गावकर्यांनी बोडीकडे धाव घेतली. बोडीत पाहणी केली असता तिघांचे मृतदेह आढळून आले.