हिंगोली (Dussehra Festival) : येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवा निमित्ताने उभारण्यात आलेल्या (Dussehra Festival) दसरा महोत्सवातील कृषी व औद्योगिक प्रदर्शनीचे २२ सप्टेंबर सोमवारी सायंकाळी ८.३० वा. उदघाटन होणार आहे. या प्रदर्शनीचे उदघाटन जिल्हाधिकारी राहूल गुप्ता यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी जिल्हाचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ, आमदार तथा अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्र वसमत हेमंत पाटील, खा. नागेश पाटील आष्टीकर, आ. प्रज्ञा सातव, शिक्षक आ. विक्रम काळे, पदवीधर आ. सतिश चव्हाण, आ. संतोष बांगर, आ. राजु नवघरे, माजी आ. गजानन घुगे, माजी आ. जयप्रकाश दांडेगावकर, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ. जयप्रकाश मुंदडा, माजी आ. डॉ. संतोष टारफे, माजी आ. साहेबराव पाटील गोरेगावकर, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी आ. रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांची उपस्थिती राहणार आहे.
दरम्यान सायंकाळी ६ वाजता रामलीला मैदानावर हनुमान मुर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच २२ ते २६ सप्टेंबर या कालावधीत जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मैदानावर क्रिकेटचे सामने होणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता शिवलीला सभागृहात नृत्य स्पर्धा सकाळी दहा वाजता घेण्यात येणार आहेत.
२६ ते २९ सप्टेंबर जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मैदानावर फुटबॉल स्पर्धा सायंकाळी चार वाजता होणार आहेत. तसेच २७ सप्टेंबर शिवलीला सभागृहात सकाळी दहा वाजता गायन व एमआयडीसी लिंबाळा येथे बँटमिंटन स्पर्धा, सकाळी ७.३० वा. जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मैदानावर सायकल स्पर्धा, २८ सप्टेंबर रविवारी मँरेथाँन स्पर्धा ९ वाजता कराटे स्पर्धा सकाळी १० वा. शिवलीला पँलेस येथे आदर्श कुटुंब स्पर्धा, सकाळी ११ वाजता मध्यवर्ती बँकेच्या मैदानावर हाँलीबाँल स्पर्धा, दुपारी बारा वाजता शिवाजीराव सभागृहात वक्तृत्व आणि मेकअप स्पर्धा, सायंकाळी सात वाजता रामलीला मैदानावर ह.भ.प. किशोर महाराज दिवटे यांचे किर्तन.२९ सप्टेंबर सोमवारी सकाळी १० वा. शिवलीला सभागृहात फेन्सींग स्पर्धा, सायंकाळी सहा वाजता रामलिला मैदानावर हिंदी व मराठी गितांचा कार्यक्रम, ३० सप्टेंबर मंगळवारी सकाळी ११ वा. रामलिला मैदानावर कुस्ती स्पर्धा, १ आँक्टोंबर बुधवार सकाळी १२ वा. पोलिस कवायत मैदानावर कब्बडी स्पर्धा, २ आँक्टोंबर गुरुवार रात्री ११ ५३ व. रामलिला मैदानावर रावण दहण, ३ आँक्टोंबर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता रामलिला मैदानावर भरतभेट, तसेच रामलिला मैदानावर स्वरगंधा आँर्केस्ट्रा, ४ आँक्टोंबर शनिवारी सायंकाळी ८ वा. रामलिला मैदानावर पानसुपारी व समारोपीय कार्यक्रम होणार आहे.
या (Dussehra Festival) कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आ. तथा दसरा महोत्सव समितीचे सदस्य तान्हाजी मुटकुळे, उपविभागीय अधिकारी तथा दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष समाधान घुटुकडे, महंत कौशल्यादास महाराज तथा दसरा महोत्सव समितीचे सचिव तहसीलदार श्रीकांत भुजबळ,स्वातंत्र्य सैनिक तथा दसरा महोत्सव समितीचे सदस्य माणिकराव टाकळगव्हाणकर, न. प. चे मुख्याधिकारी तथा दसरा महोत्सव समितीचे सदस्य अरविंद मुंढे, प्राचार्य तथा दसरा महोत्सव समितीचे सदस्य प्रा. विलास आघाव, हिंगोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा दसरा महोत्सव समितीचे सदस्य विष्णू भोजे, वकील संघाचे अध्यक्ष तथा दसरा महोत्सव समितीचे सदस्य अँड. सुनील भुक्तार यांच्यासह सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.