पुसद (Pusad) :- 1972 रोजी माजी मुख्यमंत्रीकै. वसंतराव नाईक व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व हस्ते पुसद नवीन बस स्थानकाच्या इमारतीचे उद्घाटन झाले होते. या इमारतीला जवळपास 53 वर्षाच्या वर काळ लोटला आहे. पुसद बस स्थानकाच्या नवीन इमारतीचे काम होणे अत्यंत गरजेचे आहे. तर पुसद आगाराच्या व बस स्थानकाच्या इमारतीला मोठी जागा उपलब्ध आहे.
इमारतीला जवळपास 53 वर्षाच्या वर काळ लोटला
या ठिकाणी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून चारी दिशेने व्यावसायिक गाळे तर काढले एसटी महामंडळाला (ST Corporation) व पुसद आगाराला मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. तर नागरिकांनाही वेगवेगळ्या सुविधा प्राप्त होऊ शकतात. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या संदर्भात नवीन आलेल्या सरकारमध्ये सामील होत असलेल्या आमदार इंद्रनील नाईक यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. पुसद आगाराचे तत्कालीन आगार व्यवस्थापक तथा स्थानिक शहरातील रहिवासी मंगेश पांडे यांच्या कारनाम्यामुळे पुसदच्या बस स्थानकाची (Bus Stand)इब्रत गेलेली आहे. उरली सुरली जे असणारे अधिकारी आहेत ते घालवण्याचा प्रयत्न करीत आहेत हे थांबलं पाहिजे.