परभणी (Parbhani) :- दिड लाखाची लाच (bribe) स्विकारताना जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. संबंधितांवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यांना न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने (Courts) दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजुर केली आहे.
क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी लाच घेताना ताब्यात अँटी करप्शन च्या जाळ्यात
या बाबत अधिक माहिती अशी की, क्रीडा अधिकारी कविता नावंदे, क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी यांनी तक्रारदार यांचे देयक काढण्यासाठी अडिच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी एक लाख रुपये स्विकारले. तसेच उर्वरित दिड लाख रुपये घेत असताना गुरुवार २७ मार्च रोजी परभणीच्या लाचलूचपत विभागाने दोन्ही लोकसेवकांना रंगेहाथ ताब्यात घेतले. नानकसिंग बस्सी यांनी स्वत:साठी ५० हजार आणि कविता नावंदे यांच्यासाठी एक लाख रुपये लाच स्विकारली. संबंधितांवर गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. कविता नावंदे यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली आहे. मागील आठवड्यात त्यांची ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. यामध्ये देखील त्या रक्कमेची मागणी करत होत्या. आ.डॉ. राहुल पाटील यांनी देखील या बाबत विधानसभेत मुद्दा उपस्थित करुन चौकशीची मागणी केली होती.