प्राथमिक शिक्षण विभागाचा गोंधळ चव्हाट्यावर
परभणी (Education department) : सेवानिवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती विषयक उपदान, अंश राशिकरण, गट विमा योजना न मिळाल्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर (Retirement benefit) सेवानिवृत्त्त मुख्याध्यापकाने उपोषण (Headmaster hunger strike) सुरू केले. या निमित्ताने प्राथमिक शिक्षण विभागाचा (Education department) गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. या उपोषणस्थळी आ. डॉ. राहुल पाटील व आ.सुरेश वरपुडकर यांनी भेट दिली.
आ.डॉ.राहुल पाटील, आ.सुरेश वरपुडकर यांची उपोषण स्थळाला भेट
मधुकर निवृत्तीराव कदम हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरवंड बु. येथून नियत वयोमानानुसार ३० जून २०२३ रोजी मुख्याध्यापक या पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्यांनी आवश्यक प्रस्ताव सादर केला. मात्र त्यांना सेवानिवृत्ती वेतन (Retirement benefit) व इतर लाभ मिळाले नाहीत. या बाबत वारंवार निवेदन, पत्रव्यवहार करुनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही. अखेर मधुकर कदम यांनी उपोषणाचे हत्यार उपसले असून सोमवार २२ जुलै पासून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.
शिक्षणाधिकार्यांनी नेमली चौकशी समिती
सेवानिवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती विषयक लाभ मिळण्यासाठी (Headmaster hunger strike) मुख्याध्यापकांनी उपोषण सुरू केल्यानंतर चौकशी समिती नेमल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनिल पोलास यांनी दिली.