Gadchiroli :- या गावातील रस्त्यावर जिथे तिथे खड्डेच खड्डे पडले आहेत.रस्त्याचे काम ताबडतोब करण्यात यावे अशी मागणी घेऊन नगरपंचायत, तहसिलदार आणि जिल्हा परिषद (Zilla Parishad) बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले.या रस्त्याचे काम लवकरच करण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी गणेश सोनवणी यांनी दिले. हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे (Construction Department) असल्याने आम्ही दुरूस्ती किंवा बांधकाम करू शकत नाही असे नगरपंचायत प्रशासनाचे म्हणणे होते.
2021 पासून या नगरपंचायत मध्ये कांग्रेसची सत्ता
जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि नगरपंचायतच्या पेचात गावातील रस्ते पडल्यामुळे, या रस्त्यावर जिथे तिथे खड्डेच खड्डे पडले आहेत. या रस्त्याने चालत जाने किंवा सायकल, मोटारसायकलने जाने दुरापास्त झाले आहे. त्यामुळे त्रस्त झालेले गावकरी आधी गावातील हनुमान मंदिरात जमा झाले. नंतर जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि नगरपंचायत व तहसीलदार यांना निवेदन दिले. 15 दिवसाच्या आत सदर रस्त्याचे बांधकाम सुरू झाले नाही तर, मोठा आंदोलन करण्याची ताकीद दिली. 2021 पासून या नगरपंचायत मध्ये कांग्रेसची सत्ता आहे. त्यापूर्वी 2015 पासून 2021 पर्यंत भाजपाची सत्ता होती.यावेळी भारतीय जनता पक्ष विरोधात आहे. जरी नगरपंचायतवर कांग्रेसची सत्ता आहे तरीही, येथील प्रत्येक काम भाजपा सोबत मिळून मिसळून केले जात आहेत.त्यामुळे गावातील समस्या वाढल्या असे लोकांचे म्हणणे आहे.
निवेदन देताना माजी सरपंच अनुसयाबाई बागडेहेरिया, संतोष मोहुर्ले,चतुर सिंद्राम, निरिंगसाय मडावी,यादव खोब्रागडे, नंदकिशोर वैरागडे ,शालीकराम कराडे, हमीदखा पठाण, गुरूदेव मेश्राम,विठ्ठल गुरनुले, हिरामन मोहुर्ले,हरिश्चंद्र जुळा,गोपाल मोहुर्ले,रोशन शेंडे,मानसिंह कुमरे, जोयधा जमकातन,देवलाल सांगसुरवार, खिलावन मेश्राम,अरविंद मोहुर्ले, प्रशांत मोहुर्ले,गजानन मोहुर्ले,श्रीहरी मोहुर्ले,दिगांबर पडोटी,आशाराम राऊत,विनोद गुरनुले,मधुकर शेंडे,दसरू जमकातन,वामन मोहुर्ले,चेतन मेश्राम आणि महीला पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.