हिंगोली (Hingoli Crime Case) : शहरातील खडकपुरा भागातील एका वयोवृध्द महिलेस तुम्हाला ३० हजार रुपये भेटणार असल्याने तुमचा फोटो काढावयाचा आहे असे म्हणुन सोन्याच्या बाळ्या पळविल्याने हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, (Hingoli Crime Case) हिंगोली शहरातील खडकपुरा भागातील रेहानाबी शेख हनिफ कुरेशी ही वयोवृध्द महिला १४ ऑक्टोंबरला दुपारच्या सुमारास परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरून जात असताना एका अनोळखी व्यक्तीने तिच्या जवळ येऊन तुम्हाला ३० हजार रुपये मिळणार आहेत.
त्यासाठी तुमचा फोटो काढावयाचा आहे, असे म्हणुन तुम्ही तुमच्या कानातील सोन्याच्या बाळ्या काढून ठेवा असे सांगताच महिलेने दोन्ही कानातील २८ ग्रॅमच्या १६ हजार ८०० रुपयाच्या बाळ्या काढल्या नंतर त्यांना पिशवीत ठेवण्यास सांगितल्या. यावेळी अनोळखी भामट्याने महिलेची बाळ्या ठेवलेली पिशवी चोरून घेऊन गेल्याने १९ ऑक्टोंबरला हिंगोली शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास शेख हे करीत आहेत.