परभणीतील सेलू तालुक्यातील चिकलठाणा बु. शिवारातील घटना अकस्मातची नोंद!
परभणी (Electric Shock) : वायरिंग जोडण्याचे काम करत असताना अचानक विजेचा धक्का लागुन कंत्राटी लाईनमनचा मृत्यू झाला. ही घटना २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास सेलू तालुक्यातील चिकलठाणा बु. शिवारात घडली. सदर प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
रघुनाथ काळदाते यांनी खबर दिली आहे. भागवत जनार्धन काळदाते वय ३२ वर्ष, असे मयताचे नाव आहे. भागवत काळदाते हे कंत्राटी लाईनमन म्हणून कार्यरत होते. चिकलठाणा बु. शिवारातील गट नंबर १८७ मध्ये शेत आखाड्यावर लाईट दुरुस्ती वायरिंग जोडण्याचे काम करत असताना अचानक विद्युत वायरला हाताच्या बोटाचा स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार शॉक लागुन भागवत काळदाते यांचा मृत्यू झाला. सेलू पोलिसात (Selu Police) अकस्मात मृत्यु   ची नोंद करण्यात आली आहे. तपास पोह. राठोड करत आहेत.




 
			 
		

