Gadchiroli :- विद्युत दुरूस्ती व देखभालीच्या कामावर जात असतांना अचानक रानडुकरांच्या कळपाने रस्ता मार्गक्रमण करतांना दुचाकीला धडक दिल्याने विद्युत कामगार (Electrical workers) गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरूवार १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील खैरी – कुरखेडा मार्गावर घडली. सुधीर प्रभुदास बोरकर (३३) रा.खैरी ता.कुरखेडा असे जखमीचे नांव आहे.
कुरखेडा तालुक्यातील खैरी- कुरखेडा मार्गावरील घटना
प्राप्त माहितीनुसार सुधीर हा गडचिरोली येथील स्नेहल इलेक्ट्रीकल्स अॅन्ड सव्हीसेस या कंपनीत काम करीत आहे. तो आज कंपनीच्यावतीने घेण्यात आलेल्या कामावरील देखभाल , दुरूस्तीच्या कामावर दुचाकीने जात असतांना अचानक जंगलातून रानडुकरांचा कळप रस्त्यावर आला. रानडुकरांनी (Wild boars)सुधीरच्या दुचाकीस धडक दिली तसेच रानडुकरांचा कळप त्याच्या अंगावरून गेला. त्याला प्रथम कुरखेडा येथील शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढली उपचारासाठी ब्रम्हपुरी येथे हलविण्यात आले आहे. त्याच्या डोक्याला व उजव्या खांद्याला मार लागला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.