परिसरातील विज समस्यचे निराकरन!
कोरेगाव, चोप (Electricity Sub-Centre) : देसाईगंज तालूक्यातीत कोरेगाव ग्रा.प. येथे 33 केव्ही विज उपकेंन्द्रा करीता सर्वे न. 5 7 2 / 1 महसुली जागेत परीसरातील विज समस्या जानुन उपकेन्द्रासाठी कोरेगावचे प्रभारी सरपंच धनंजय तिरपुडे यांच्या मार्गदशनात 33 केव्ही विज उपकेन्द्र संयुक्त स्थळ पाहणी अहवाल (Report) सादर करून स्थळ पाहणी करण्यात आली. यावेळी बागडे विज सहाय्यक अभियंता वडसा, एन . एफ. बंसोड विस्तार अधिकारी ग्रा.प. कोरेगाव, पठाण प्रधान तंत्रज्ञ वडसा, सुनिल कांबळे वनरक्षक चोप, कोरेगाव, अंकुश सहारे विज उपकेन्द्र ऑपरेटर वडसा, तितेश बावणे वायरमॅन कोरेगाव, रमेश मेश्राम रोजगार सेवक कोरेगाव,देवा राऊत यांचे उपस्थितीत सदर जागेची पाहणी केली असता सोईस्कर असल्याचे निदर्शनात आले, त्यामुळे कोरेगाव, चोप, बोळधा परिसरातील विज समस्यचे (Electricity Problem) निराकरन होऊ शकते करीता स्थळ पाहणी अहवाल सादर करण्यात आला.




