बनवाडी शिवारातील घटना..!
परभणी (Electricity worker Death) : गंगाखेड येथे विज वितरण कंपनीच्या विद्युत खांबावर चढून विज दुरुस्ती करणाऱ्या खाजगी कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना बनवाडी शिवारात घडली. याप्रकरणी पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत गंगाखेड पोलीस ठाण्यात सुरु होती. Electricity worker Death dies after falling from pole
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड तालुक्यातील हरंगुळ, शेंडगा, मानकादेवी गावाकडे विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या विजेच्या खांबावर बनेवाडी शिवारात बिघाड झाल्याने या खांबाची दुरुस्ती करण्यासाठी रविवार 8 जून रोजी विज महावितरण कंपनीचे (Electricity worker Death) लाईनमॅन विनोद फड यांच्यासोबत गेलेल्या खाजगी विज कामगारापैकी ज्ञानोबा विठ्ठलराव फड वय 35 वर्ष रा. बोर्डा हे विजेच्या खांबावरून खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी अंदाजे 2 वाजेच्या सुमारास घडली.
सहकारी कामगार व लाईनमॅन यांनी (Electricity worker Death) गंभीर जखमी कामगार ज्ञानोबा फड यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा टाके, परिचारिका पल्लवी माने, मनिषा माने यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. विजेच्या खांबावरून पडल्याने खाजगी कामगाराचा मृत्यु झाल्याची माहिती समजताच ग्रामीण विभागाचे अभियंता कैलास फड, नृसिंग लटपटे, गणपती सोन्नर, संदीप खांडेकर, मनोज सुरवसे आदींनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
पोलीस ठाण्याचे संतोष मोहळे, राम पडघन यांनी पंचनामा केला. मयत ज्ञानोबा विठ्ठलराव फड वय 35 वर्ष रा. बोर्डा ता. गंगाखेड यांच्या पश्चात एक मुलगा, आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत परभणीच्या गंगाखेड पोलीस ठाण्यात सुरु होती.